मुंबई, 13 जुलै- सध्या लोकप्रिय टीव्ही शो ‘खतरों के खिलाडी 12’ ची (Khatron Ke Khiladi Season 12) जोरदार चर्चा आहे. आपले आवडते कलाकार कोणकोणते जबरदस्त स्टंट करताना दिसणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. दरम्यान आता ही प्रतीक्षा संपलेली आहे. नुकतंच या सीजनच्या आगामी एपिसोडचे काही व्हिडीओ सर्वांसमोर आले आहेत. हे व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत आहेत. कारण नुकतंच समोर आलेल्या एक प्रोमोमध्ये टीव्ही अभिनेता मोहित मलिकचा (Mohit Malik) चक्क सिंहासोबत स्टंट करताना दिसून येत आहे. ‘खतरों के खिलाडी-12’ या शोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) हा शो होस्ट करणार आहे. रोहित शेट्टीच्या स्टंट आधारित रिअॅलिटी शोमध्ये कोणकोणते कलाकार सहभागी होणार याची सर्वांना उत्सुकता होती.काही दिवसांपूर्वीच यशोमधील कलाकारांची नवे उघड झाली होती. त्यांनतर आता शोच्या आगामी एपिसोडचे काही स्टंट समोर आले. यामध्ये टीव्हीवरील हे प्रसिद्ध कलाकार अक्षरशः जीवाची बाजी लावून स्टंट करताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कनिका मान आणि कोरियोग्राफर निशांत भट्ट यांना स्टंट दरम्यान गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. त्यांनतर आता अभिनेता मोहित मलिक आणि राजीव अदातीयाचा थरकाप उडविणारा व्हिडीओ समोर आला आहे. नुकतंच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये मोहित आणि राजीव जंगलाचं राजा म्हणल्या जाणाऱ्या सिंहासोबत जबरदस्त स्टंट करताना दिसून येत आहेत.या स्टंटमध्ये राजीव आणि मोहितला एका वेगवगेळ्या पिंजऱ्यात बंद केलं जातं. हा बॉल शेप पिंजरा असतो. यामध्ये बंद केल्यानंतर एक-दोन नव्हे तर तब्बल ५ मोठमोठे सिंह त्यांच्यावर हल्ला करतात. ते पाहून उपस्थित स्पर्धकसुद्धा भयभयीत होतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून या दोघांचे चाहते त्यांची चिंता करत आहेत.
**(हे वाचा:** हेलिकॉप्टरमध्ये अचानक Bear Gryll ला किस करु लागला रणवीर सिंह; त्यांनतर जे घडलं,पाहा VIDEO ) या स्टंटबाबत बोलताना मोहित मलिकने म्हटलं, ‘‘मला माहिती आहे की, हा स्टंट पाहताना माझ्या मुलाला प्रचंड आनंद होणार आहे. कारण त्याला सिंह खूप आवडतात. मात्र हा अनुभव खरंच भयानक होता. कारण साऊथ आफ्रिकेतील सिंह प्रचंड मोठे आणि ताकदवान असतात. त्यांचा सामना करणं खरंच जबरदस्त होतं. स्टंटदरम्यान सिंहाने आपला पंजा पिंजऱ्यावर मारला, तेव्हा त्याची नखे आत आली, त्यावेळी मी किमान १५ सेकंद स्तब्ध झालो होतो. मला काहीही कळत नव्हतं. त्यांनतर मला हे ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ मध्ये आल्यासारखं जाणवलं’.