मुंबई, 20 जून- ‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेता सेझन खान सध्या टीव्हीवर दिसत नसला तरी एका वेगळ्या कारणामुळं चर्चेत आला आहे. सेझन खानवर आयेशा पिरानी नावाच्या एका महिलेने घरगुती हिंसाचार आणि खंडणीचा आरोप केला आहे.स्वत:ला सेझन खानची पत्नी म्हणवणाऱ्या आयशा पिरानीने अभिनेत्याविरोधात FIR दाखल केला आहे आणि अनेक गंभीर आरोपही केले आहेत.आयशाने 7 जून रोजी सेझन खानविरोधात तक्रार दाखल करून 8 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती. ‘न्यूज 18’ ने सिझेन खानशी संपर्क साधला असता, त्यांनं या महिलेला ‘वेडी’ म्हणत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तो म्हणाला, ‘हे खरे नाही. ही महिला कशाबद्दल बोलत आहे हे देखील मला माहित नाही. आतापर्यंत कशीलच एफआयआर नोंदवला नाही, असे काहीही झालेले नाही. कोणीही काहीही करू शकतो. मला आता यावर काहीच बोलायचे नाही, हे सगळं बकवास आहे, असं म्हणत अभिनेत्यानं सर्व आरोप फेटाळून लावले. वाचा- अरुंधतीची नणंद बनली लेडी दबंग! म्हणाली, खाकी वर्दी अंगावर चढवताना… महिलेनं काय केले आहेत आरोप? या महिलेने दावा केले आहे की, तिनं आणि सेझन याने 2015 मध्ये लग्न केले होते. सेझनने हे लग्न गुपित ठेवण्यास सांगितले होते आणि नंतर अचानक घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही केली.आयशाच्या आरोपांनुसार, सेझानने अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी तिचा वापर केला आणि तिची फसवणूक केली.
एकता कपूरच्या टीव्ही शो ‘कसौटी जिंदगी की’ मध्ये अनुराग बासूची भूमिका साकारून सेझन खान खूप लोकप्रिय झाला. श्वेता तिवारीसोबतची त्याची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती. अभिनेता अलीकडे टीव्ही शो अपनापन: बदलते रिश्तों का बंधन मध्ये दिसला होता.