मुंबई, 5 मार्च- स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रत्येक मालिका टीआरपीच्या रेसमध्ये पुढे आहे. फुलाला सुंगध मातीची ( phulala sugandh maticha ) मालिका देखील टीआरपी रेसमध्ये सध्या नंबर वनवर आहे. मालिकेतील **( phulala sugandh maticha latest episode )**किर्ती आणि शुभम यांची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. सध्या मालिकेत किर्तीचं IPS ऑफिसर होण्याचं ट्रेनिंग सुरू झालं आहे. याचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. किर्तीसाठी हे ट्रेनिंग खूप महत्त्वाचं आहे. अशातच मालिकेत दोन अभिनेत्रीच एंट्री होणार आहे. याविषयी एका पोर्टलनं माहिती दिली आहे. किर्तीची ट्रेनर अग्रीमा पाटीलची भूमिका अभिनेत्री मानसी कुलकर्णी साकारणार आहे तर कार्तिकी सारखंच ट्रेनीची भूमिकेत केतकी विलास पालव दिसणार आहे. या दोन नव्या अभिनेत्रींच्या एंट्रीमुळे मालिकेत नवीन ट्वीस्ट येणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. वाचा- साई धरम तेज ते आलिया भट्ट यांच्या चित्रपटांचं झालंय युक्रेनमध्ये शूटिंग अभिनेत्री केतकी विलास पालव ‘कुसुम’ मालिकेत एलिशाची भूमिका साकारताना दिसली होती. यापूर्वी केतकी सुख म्हणजे नक्की काय असतं मध्ये दिसली होती. तिन जयदीपची मैत्रीण ज्योतिकाची भूमिका साकारली होती. यासोबतच केतकी मटा श्रावणक्वीन स्पर्धेची देखील विजेती ठरलेली आहे. त्यानंतरत तिनं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. आता ती फुलाला सुंगध मातीचा मालिकेत दिसणार आहे.
मानसी कुलकर्णी ‘झी मराठी’वरील ‘कुंकू’ या लोकप्रिय मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. मानसीने ‘फु बाई फु’ ‘1760 सासूबाई’ या मालिकेतही तिने काम केलं आहे. ‘1760 सासूबाई’ मध्ये तिने अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या सुनेच्या भूमिका साकारली होती. आता या मालिकेत ती नव्या भूमिकेत दिसणार आहे.