Home /News /entertainment /

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचं शूटिंग पुन्हा होणार सुरू? कोल्हापुरात झाली कलाकारांची कोरोना टेस्ट आणि...

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचं शूटिंग पुन्हा होणार सुरू? कोल्हापुरात झाली कलाकारांची कोरोना टेस्ट आणि...

झी मराठीवरील अनेकांची आवडती मालिका 'तुझ्यात जीव रंगला'च्या प्रेक्षकांसाठी पहिली आनंदाची बातमी येत आहे. या मालिकेचे शूटिंग लवकरच कोल्हापूरमध्ये सुरू होणार आहे.

    कोल्हापूर, 19 जून : कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात (Coronavirus Lockdown) सिनेमा तसंच मालिकांचे शूटिंग पूर्णपणे ठप्प होते. परिणामी प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिकांनी काहीसा ब्रेक घेतला होता. दरम्यान अनलॉकच्या (Unlock 1.0) या फेजमध्ये बंद झालेल्या मालिकांचे शूटिंग पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे. झी मराठीवरील अनेकांची आवडती मालिका 'तुझ्यात जीव रंगला'च्या प्रेक्षकांसाठी पहिली आनंदाची बातमी येत आहे. या मालिकेचे शूटिंग लवकरच कोल्हापूरमध्ये सुरू होणार आहे. गेल्या अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी मालिकांचे शूटिंग बंद आहे. त्यामुळे सगळ्याच टीव्ही चॅनेलवर जुन्या मालिका प्रसारित केल्या जात आहेत. त्यामुळे काहीशा कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी ही एक आनंदाची बाब आहे. एबीपी माझाने यासंदरर्भात वृत्त दिले आहे. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील कलाकार पुण्या-मुंबईतून कोल्हापूरमध्ये दाखल झाले असून त्याठिकाणी सर्वप्रथम कोरोना चाचणी करण्यात आली. या सर्व कलाकारांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती आणि त्यानंतर नियमानुसार त्यांना 10 हॉटेल क्वारंटाइन तर 4 दिवस होम क्वारंटाइन देखील ठेवण्यात आले होते. (हे वाचा-सिद्धूच्या मुलीचे हॉट PHOTO व्हायरल, अभिनेत्रींना टक्कर देईल असा बोल्ड अंदाज) यानंतर पुन्हा एकदा या सर्व कलाकारांची चाचणी केली जाणार आहे. दरम्यान या मालिकेचे चित्रिकरण सोमवारपासून सुरू होऊ शकते. म्हणजेच लवकरच प्रेक्षकांना राणा दा आणि पाठक बाईंचा रोमान्स पाहता येणार आहे.
    चित्रिकरणाला सुरूवात झाल्यानंतर कदाचित त्याच्या पुढच्याच आठवड्यात मालिका प्रेक्षकांसाठी दाखवण्यात येईल. मात्र मालिकेमध्ये प्रेक्षकांना चिमुरड्यांची धमाल पाहता येणार नाही. कारण नियमानुसार लहान मुलं किंवा 65 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या कलाकारांना मालिकेच्या सेटवर येण्याची परवानगी नाही आहे. त्यामुळे लक्ष्मी किंवा युवराज काही दिवस तरी मालिकेमध्ये दिसणार नाहीत. कोल्हापूरमध्ये या मालिकेचं चित्रिकरण होतं, दरम्यान अनेक मालिकांचं ज्याठिकाणी चित्रिकरणं केलं जातं ती फिल्मसिटी कधी सुरू होणार याबाबत मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही
    First published:

    Tags: Tuzyat jiv rangala

    पुढील बातम्या