मुंबई, 2 फेब्रुवारी: झी मराठी वाहिनीवर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (Tuzhya Mazhya Sansarala Aani Kay Hava) ही नवी मालिका काही दिवसापूर्वी सुरू झाली आहे. या मालिकेत हार्दिक जोशी आणि अमृता पवार या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून हार्दिक जोशी ला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. तर अमृता पवार हिने स्वराज्यजननी जिजामाता मालिकेतून जिजाबाईंची भूमिका साकारली होती. या मालिकेत बरेचसे नवखे कलाकार झळकताना दिसत आहेत. एकत्र कुटुंब पद्धत कशी असते हे या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणाऱ्या अमृताबद्दल (Amruta Pawar) प्रेक्षकांना एक गोष्ट माहिती नसेल. तिला अभिनेत्री व्हायचे नव्हते तर तिला एका वेगळ्या क्षेत्रात करिअर करायचे होते. एका पोर्टलच्या रिपोर्टनुसार, अमृता पवार हिला सीए व्हायचे होते.यातच तिला करिअर (Amruta Pawar biography) करायचे होते. मात्र कॉलेज जीवनात तिनं अनेक एकांकिका स्पर्धा गाजवल्या व त्यातूनच तिला अभिनायची ओढ निर्माण झाली. यानंतर तिनं अभिनय क्षेत्रात नशिब आजमवयाचे ठरवेल. आता ती सध्या झी मराठी वाहिनीवर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत दिसत आहे. तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.
अमृताने शालेय शिक्षण मुंबईतील पार्ले टिळक विद्यालय विलेपार्ले येथून पूर्ण केले. आर.ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स कॉलेजमधीन पदवीचे शिक्षण घेतेले. अमृता अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सीए अंतर्गत लेखापाल म्हणून काम करत होती. यानंतर तिनं अभिनेत्री म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात दुहेरी या मराठी मालिकेतून केली. यानंतर तिनं ये रे ये रे या डान्स शो मध्ये भाग घेतला. त्याच वर्षी तिने स्वराज्य जननी जिजामाता या ऐतिहासिक मालिकेत जिजामातांची भूमिका साकारली.