मुंबई, 23 एप्रिल- ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका 2 मे पासून स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री नऊ वाजता प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत गाण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या स्वराची ही कहाणी आहे. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वरा आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहे. मात्र आपला बाप कोण? या प्रश्नाचे उत्तर माहीत नसलेल्या स्वराला याचा उलगडा कधी होणार हे मालिकेतून पाहायला (Urmila Kothare Upcoming Serial on Star Pravah) मिळणार आहे. या मालिकेत स्वराची भूमिका अन्वी तायवडे (Avni Taywade) या बालकलाकाराने साकारली आहे. आता या मालिकेत स्वराच्या सावत्र बहिणीच्या भूमिकेत अवनी जोशी (Avnee Joshi) दिसणार असल्याचे समोर आलं आहे. एक पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत स्वराच्या सावत्र बहिणीच्या भूमिकेत मी होणार सुपरस्टारची होस्ट अवनी जोशी दिसणार असल्याचे समोर आलं आहे. याशिवाय मालिकेत उर्मिला कानेटकर कोठारे, अभिजित खांडकेकर यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. वाचा- प्रसिद्ध गायकाच्या 3 वर्षाच्या मुलीला 5स्टार हॉटेलमध्ये सहन करावा लागला हा त्रास स्टार प्लसवरील ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या मालिकेचा ‘तुझेच मी गीत गात आहे’ हा मराठी रिमेक असणार आहे. मुळात ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ हा शो बंगाली मालिकेचा रिमेक होता. त्याचा हिंदी रिमेकला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता मराठी रिमेक स्टार प्रवाह घेऊन येत आहे. वाचा- जॅकलिन फर्नांडिसचं जंगी सेलिब्रेशन, कारण आहे फारच खास अवनी जोशीबद्दल थोडसं…. स्टार प्रवाहवरील साथ दे तू मला या मालिकेतून अवनीने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. अवनीला गायनाची देखील आवड आहे. हे गुण तिला तिच्या आई- वडिलांकडूनच मिळाले आहेत. कारण अवनीचे आई वडील देखील गायक आहेत. अवनीचे वडील अनिरुद्ध जोशी आणि आई रसिका जोशी हे दोघेही गायक आहेत. झी टीव्हीवरील आयडिया सारेगमप या शोचा विजेता तसेच सूर नवा ध्यास नवा ह्या शोचा विजेता ठरले होते. वेगवेगळ्या म्युजिक अल्बममधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अनिरुद्ध जोशी यांनी आतापर्यंत अनेक मंचावरून गाण्याचे सादरीकरण केले आहे.
अगदी सुरुवातीपासूनच त्यांनी आपले सारे लक्ष संगीत क्षेत्रांवर केंद्रीत केले होते. अवनीची आई रसिका जोशी या देखील गायिका आहेत. अवनीला गायनाची आवड असल्याने तिची ही आवड जोपासण्यासाठी अनिरुद्ध आणि रसिका नेहमीच प्रोत्साहन देताना दिसतात. आता अवनील नवीन भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उतुसक आहेत.