मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Tunisha Sharma: तुनिषा-शिझान प्रकरणाला नवं वळण; न्यायालयाने पोलीसांनाच केली 'ही' विचारणा

Tunisha Sharma: तुनिषा-शिझान प्रकरणाला नवं वळण; न्यायालयाने पोलीसांनाच केली 'ही' विचारणा

तुनिषा शर्मा

तुनिषा शर्मा

Tunisha Sharma-sheezan khan case Update: टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड-अभिनेता शिझान खानला अटक करण्यात आली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 3 फेब्रुवारी- टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड-अभिनेता शिझान खानला अटक करण्यात आली होती. तुनिषाच्या आईने अभिनेत्यावर गंभीर आरोप लावत त्याला अटक करण्याची मागणी केली होती. त्यांनतर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं होतं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दरम्यान उच्च न्यायालयाने आता पोलिसांना विचारणा करत या प्रकरणातील ठोस पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पाहूया न्यायालयाने नेमकं काय सांगितलं आहे.

गुरुवारी झालेल्या सुनावणीत शिझान खान प्रकरणाला नवं वळण लागताना दिसून येत आहे. सुनावणीत काल उच्च न्यायालयाने या प्रकरणात तपास करत असलेल्या पोलिसांना तपास योग्य दिशेने सुरु आहे का? तुनिषाच्या आईच्या आरोपांवरुन किंवा जबाबातून कोणतंही ठाम हेतू साध्य होत नाहीय. त्यामुळे शिझान खानने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्ट पुरावे आहेत का? नसतील तर त्या दिशेने तपास सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

(हे वाचा:Tunisha Sharma: तुनिषाच्या मृत्यूच्या 19 दिवसांनंतर सेटवर परतले कलाकार; 'या' अभिनेत्याने घेतली शिजानची जागा )

या प्रकरणातील गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे तसेच पृथ्वीराज चव्हाण खंडपीठाने सरकारी वकील असलेल्या अरुणा पै यांच्याकडे विचारणा केली. सोबतचे न्यायालयाने शिझान खानने केलेल्या अंतरिम जामिनावरील अर्जावर त्वरित दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शिझानला न्यायालयाकडून दिलासा मिळेपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे.

अभिनेत्री तुनिषा शर्मा 'अलीबाबा:दास्तान-ए-काबुल' मालिकेत मरियमची भूमिका साकारत होती. तुनिषाने काही दिवसांपूर्वी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली होती. यानंतर अभिनेत्रीच्या आईने मालिकेचा मुख्य अभिनेता आणि तुनिषाचा बॉयफ्रेंड शिझान खानवर गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार केली होती. त्यांनतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होत. अभिनेता अद्यापही तुरुंगात आहे. या सर्व प्रकरणात मालिका बंद ठेवण्यात आली होती. मालिकेचं शूटिंग पूर्णपणे ठप्प होतं. परंतु आता मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

अलीबाबा;दास्तान-ए-काबुल' मध्ये मुख्य भूमिका अभिनेता शिजान खानने साकारली होती. भिनेत्रीने शिजान खानच्या मेकअपरुममध्ये गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं होतं. यांनतर सर्वत्र एकच खळबळ माजली होती. त्याचवेळी अभिनेत्रीच्या आईने शिजानवर आपल्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक आरोप करत त्याला अटक करण्याची मागणी केली होती. त्यांनतर पोलिसांनी अभिनेत्याला कस्टडीत घेतलं होतं.

First published:

Tags: Entertainment, Tv actress