मुंबई, 14 जानेवारी- छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यू प्रकरणाने खळबळ माजवून दिली आहे. अभिनेत्री 'अलीबाबा:दास्तान-ए-काबुल' मालिकेत मरियमची भूमिका साकारत होती. तुनिषाने काही दिवसांपूर्वी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली होती. यानंतर अभिनेत्रींच्या आईने मालिकेचा मुख्य अभिनेता आणि तुनिषाचा बॉयफ्रेंड शिजान खानवर गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार केली होती. त्यांनतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होत. अभिनेता अद्यापही तुरुंगात आहे. या सर्व प्रकरणात मालिका बंद ठेवण्यात आली होती. मालिकेचं शूटिंग पूर्णपणे ठप्प होतं. परंतु आता मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे.
गेल्या तब्बल 19 दिवसांपासून 'अलीबाबा;दास्तान-ए-काबुल' या मालिकेचं शूटिंग बंद ठेवण्यात आलं होतं. कारण मालिकेचे दोन्ही मुख्य कलाकार मालिकेतून बाहेर झाले आहेत. दरम्यान आता मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालिकेतील कलाकार मालिकेच्या सेटवर परतल्याचं म्हटलं जात आहे. तब्बल 19 दिवसांनंतर सेटवर पुन्हा कलाकार हजर झाले आहेत.आणि विशेष म्हणजे सेटवर पूजा पाठ केलं जात असल्याचं दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर सेटवरचे काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
( हे वाचा:Sanjay Chouhan Death: बॉलिवूडवर शोककळा; 'पान सिंह तोमर' चित्रपटाचे लेखक संजय चौहान यांचं निधन )
'अलीबाबा;दास्तान-ए-काबुल' मध्ये मुख्य भूमिका अभिनेता शिजान खानने साकारली होती. सध्या शिजान पोलीस कस्टडीत आहे. कोर्टाने अभिनेत्याचा जामीन फेटाळून लावल्याने त्याला सध्या तरी तुरुंगात राहावं लागणार आहे. शिजान आणि तुनिषा मालिकेतील मुख्य पात्र असल्याने मालिकेचं शूटिंग ठप्प झालं होतं. मात्र आता शूटिंगला सुरुवात झालायचं सांगण्यात येत आहे. मेकर्सनी शिजानशिवाय मालिका पुढे चालू ठेवल्याचा निर्णय घेतला आहे. असं म्हटलं जात आहे की, शिजानच्या जागी अभिनेता अभिषेक निगमला घेण्यात आलं आहे.
मात्र तुनिषाची जागा कोण घेणार याबाबत अद्याप माहिती उघड झालेली नाही. तुनिषा मृत्यूच्या 19 दिवसांनंतर सर्व कलाकार मालिकेच्या सेटवर परतले आहेत. सर्व कलाकार या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. मालिकेच्या सेटवर पूजापाठ करण्यात येत आहे. पूजेचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर समोर आले आहेत.
तुनिषा शर्माने 24 डिसेंबरला अलीबाबा; दास्तान-ए-काबुल' या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली होती. अभिनेत्रीने शिजान खानच्या मेकअपरुममध्ये गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं होतं. यांनतर सर्वत्र एकच खळबळ माजली होती. त्याचवेळी अभिनेत्रीच्या आईने शिजानवर आपल्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवूत्त केल्याचा धक्कादायक आरोप करत त्याला अटक करण्याची मागणी केली होती. त्यांनतर पोलिसांनी अभिनेत्याला कस्टडीत घेतलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tv actors