मुंबई, 05 मे: ‘अलिबाबा: दास्तान-ए-कुबूल’ मधील अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर आत्महत्या करत खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणात अनेक खुलासे झाले आहेत. अभिनेत्रीने आत्महत्या का केली याचं नेमकं कारण समोर आलं नसलं तरी या प्रकरणात याच मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता शीझान खानला अटक करण्यात आली होती. तुनिषाच्या आईने शीझान खानवर गंभीर आरोप केले होते. आपला मुलीच्या आत्महत्येला तोच जबाबदार असल्याचं तिच्या आईने म्हटलं होतं. शीझान अनेक दिवस तुरुंगात होता, पण काही दिवसांपूर्वीच त्याची जामिनावर सुटका झाली आहे. आता त्याला करिअरला पुन्हा सुरुवात करण्याची आणि परदेशात जाण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. मात्र आता त्याच्यापुढे अजून एक अडचण उभी ठाकली आहे. शीझान खान लवकरच रोहित शेट्टीचा प्रसिद्ध रिअॅलिटी स्टंट शो ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या या स्टंट शोच्या शूटिंगसाठी अभिनेता लवकरच शोच्या टीमसोबत परदेशात रवाना होणार आहे. दरम्यान, तुनिषाच्या आईने न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच त्यांनी वाहिनीच्या या निर्णयाला विरोध करत मोठे पाऊल उचलले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीच्या आईने चॅनलाच कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तिच्या आईचं असं मत आहे की, ज्या आरोपीला नुकताच कोर्टाने जामीन मंजूर केला आहे, त्याला शोमध्ये कसे घेतले जाऊ शकते. या निर्णयामुळे तुनिषाची आई चांगलीच नाराज झाली असून तिने वाहिनीला नोटीस पाठवली आहे. याला तुनिषाचे काका पवन शर्मा यांनीही दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, ‘होय हे खरे आहे की आम्ही वाहिनीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.’ Esha Deol: लेकीच्या ‘त्या’ बिकिनी सीनवर हेमा मालिनी यांनी अशी दिली होती प्रतिक्रिया; ईशा देओलनं केला खुलासा त्याने पुढे सांगितले की जर एखाद्या व्यक्तीवर केस चालू असेल आणि त्याच्याविरुद्ध आरोपपत्र असेल तर चॅनल त्याला शोचा भाग कसा बनवू शकते? शीजानला नुकताच जामीन मिळाला असून खटला सुरू आहे. ते म्हणाले की या संपूर्ण घटनेपूर्वी त्याला कधीही ऑफर आली नव्हती आणि अचानक त्याला खतरों के खिलाडीचा भाग होण्यासाठी संपर्क करण्यात आला? कोणत्या आधारावर? तसेच टीआरपीसाठी चॅनल एका आरोपीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी या वाहिनीवर केला आहे. तुनिषा शर्माने तिच्या शो ‘अली बाबा दास्तान ए काबुल’च्या सेटवर आत्महत्या केली होती. अभिनेत्री फक्त 20 वर्षांची होती. तिच्या मृत्यूनंतर, तुनिशाच्या आईने अभिनेत्रीचा प्रियकर आणि सहकलाकार शीझान खानवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला, ज्या अंतर्गत पोलिसांनी अभिनेत्याला कलम 306 अंतर्गत अटक केली. अनेक महिन्यांनंतर शीजनला वसई न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.