जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / तुनिषा शर्माच्या अंत्यसंस्कारात सामील होणार शीझान खान? आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्याची कुटुंबियांची विनंती

तुनिषा शर्माच्या अंत्यसंस्कारात सामील होणार शीझान खान? आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्याची कुटुंबियांची विनंती

तुनिषा शर्मा

तुनिषा शर्मा

तुनिषाच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी म्हणजेच आज तिच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तुनिषा शर्माच्या अंत्यसंस्कारात शीझान खान सामील होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 27 डिसेंबर : 24 डिसेंबर रोजी अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली. तिनं ‘अलिबाबा: दास्तान-ए-काबूल’ या मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली होती. या प्रकरणाला रोज नवनवीन वळण मिळत आहे. या प्रकरणी तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि को-स्टार शीझान खानला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने शीझानला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तुनिशाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचा वापर केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणीदेखील त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुनिषाच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी म्हणजेच आज तिच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मुंबईतील घोदेव स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिचा 24 डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पोस्टमॉर्टेमसाठी तिचा मृतदेह पाठवण्यात आला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, श्वास गुदरमरल्यामुळे तिचा मृत्यू झाला. तिच्या शरीरावर इतर कोणत्याही खुणा किंवा जखमा आढळल्या नाहीत. हेही वाचा - Chinmay Mandlekar: बिट्टा कराटे नंतर चिन्मय मांडलेकर साकारणार नथुराम गोडसेची भूमिका; फर्स्ट लूकने वेधलं लक्ष तुनिशाचे मामा पवन शर्मा यांनी सोमवारी (26 डिसेंबर) संध्याकाळी रुग्णालयात जाऊन तिचा मृतदेह ताब्यात घेतला. पेपर वर्क आटोपल्यानंतर त्यांना तुनिशाचं पार्थिव मिळालं. त्यांनी ते मीरा रोड येथील शवागारात ठेवलं होतं. तुनिशाच्या पार्थिवावर आज (27 डिसेंबर) दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या वेळी तिच्या जवळच्या व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    तुनिशाच्या कुटुंबीयांनी तिच्या अंत्यसंस्काराची माहिती दिली आहे. कुटुंबीयांनी लिहिलं आहे की, ‘जड अंतःकरणानं सांगावं लागत आहे की, 24 डिसेंबर रोजी तुनिशा आम्हाला सोडून गेली. 27 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता घोदेव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. सर्वांनी उपस्थित राहून तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी ही विनंती.’ या सगळ्यात शीझान खानला सामील होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारला होता मात्र त्याने याविषयी कुठलेही वक्तव्य केले नसून तो चौकशी दरम्यान फक्त रडत आहे. तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या आईनं अभिनेता शीझान खानवर आरोप केले आहेत. शीझान पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याबाबत धक्कादायक बाबी समोर येत आहेत. तुनिशाची मैत्रिण राया लबीबच्या म्हणण्यानुसार, शीझानचे 10 पेक्षा जास्त मुलींसोबत अफेअर आणि शारीरिक संबंध होते. तो तुनिशासह इतर सर्वांची फसवणूक करत होता. तुनिशाला नुकतीच शीझानची ही बाजू कळली होती. त्यामुळे ती खूप नाराज होती. इतर मुलींसोबतच्या अफेअरचा आरोप खोटा असल्याचं शीझाननं म्हटलं आहे. पोलीस पुढचा तपास करत आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात