जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Tunisha Sharma Death Case : तुनिषाचा मृत्यू आणि लव्ह जिहादच्या अँगलवर पोलिसांचा मोठा खुलासा, म्हणाले...

Tunisha Sharma Death Case : तुनिषाचा मृत्यू आणि लव्ह जिहादच्या अँगलवर पोलिसांचा मोठा खुलासा, म्हणाले...

तुनिषा शर्मा

तुनिषा शर्मा

एवढ्या लहान वयात तुनिषा हे जग सोडून गेल्याने चाहत्यांनाही धक्का बसला आहे. तुनिषा प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 डिसेंबर : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध  अभिनेत्री तुनिषा शर्मा ने मालिकेच्या सेटवर मेकअप रूममध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या दु:खद बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. वयाच्या 20 व्या वर्षी अभिनेत्रीने एवढं टोकांचं पाऊल उचलल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. एवढ्या लहान वयात तुनिषा हे जग सोडून गेल्याने चाहत्यांनाही धक्का बसला आहे. तुनिषा प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. अशातच आता तुनिषा मृत्यूप्रकरणी लव जिहाद अॅंगल असल्याचं म्हटलं जात आहे. लव जिहाद अॅंगलविषयी आता पोलिसांनी खुलासा केला आहे. तुनिषा शर्मा प्रकरणावर देखरेख करणारे सहाय्यक पोलिस आयुक्त चंद्रकांत जाधव म्हणाले की, आतापर्यंत केलेल्या तपासात कोणताही ‘लव्ह-जिहाद’ अॅंगल समोर आलेला नाही. तसेच पोस्टमार्टम रिपोर्टेमध्ये शर्मा यांच्यासोबत बळजबरीचे कोणतेही चिन्ह नाही, असं स्पष्ट केलं आहे. तुनिषा शर्माचा मृत्यू 21 वर्षांच्या होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी झाला. प्राथमिक पोस्टमार्टम अहवालात तिचा मृत्यू फाशीमुळे झाल्याचे दिसून आले आहे. पोलीस अंतिम अहवालाची वाट पाहत आहेत. हेही वाचा-  Tunisha Sharma : टुनिशा शर्मा मृत्यू प्रकरणात लव्ह जिहाद असेल तर…, राम कदमांचा इशारा या संपूर्ण प्रकरणात मोठी गोष्ट म्हणजे पोलिसांनी लव्ह जिहादचा अॅंगल पूर्णपणे फेटाळून लावला. मुंबई पोलिसांचे एसीपी चंद्रकांत जाधव म्हणाले की, पोस्टमार्टम रिपोर्ट आणि आतापर्यंतच्या तपासानुसार ब्रेकअपचा धक्का सहन न झाल्याने तुनिषाचा मृत्यू झाला. तुनिषाला ब्लॅकमेल केल्याचा कोणताही कोन अद्याप बाहेर आलेला नाही.

News18लोकमत
News18लोकमत

पोलिसांनी रविवारी शीझान खान याला अटक केली आणि त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आयपीसी कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तुनिशा शर्मा आत्महत्येप्रकरणी तिचा बॉयफ्रेंड शिझान खान याला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार तुनिशा आणि शिझान खान यांचं 15 दिवसांपूर्वी ब्रेकअप झालं होतं, त्यामुळे तुनिशा गेल्या काही दिवसांपासून तणावात होती. ती डिप्रेशनमध्येही गेल्याचं बोललं जातंय. याच कारणामुळे एवढ्या कमी वयात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या तुनिशाने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात