मुंबई, 25 एप्रिल- सध्या मराठी मनोरंजन विश्वात जोरात लग्नीघाई आहे. लवकरच विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे लग्नगाठ बांधणार आहेत. आता या सगळ्यांच्या आधी तुमची मुलगी काय करते मालिकेतील अभिनेत्याने नुकतीच लग्नगाठ बांधल्याचे समोर आलं आहे. या अभिनेत्याचे नाव तुषार घाडीगावकर आहे. 21 एप्रिल 2022 रोजी तुषार घाडीगावकर **(tushar ghadigaonkar wedding )**हा त्याची खास मैत्रीण सिद्धी सोबत विवाहबद्ध झाला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो (tushar ghadigaonkar wedding photos viral) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तुषार घाडीगावकर हा दिग्दर्शक तसेच सहकलाकार म्हणून नावारूपाला आला आहे. तुमची मुलगी काय करते या मालिकेत तो सध्या एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. मराठी मालिका तसेच नाटकांमधून त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. एवढेच नव्हे तर बॉलिवूड क्षेत्रातही त्याने पाऊल टाकलेले पाहायला मिळाले आहे. वाचा- रिंकू राजगुरूला झालंय प्रेम….!विश्वास बसत नसेल तर हा क्यूट व्हिडिओ नक्की पाहा घंटा नाद प्रॉडक्शन अंतर्गत तुषारने अनेक प्रोजक्टसाठी दिग्दर्शन केले आहे. आमचा मोरया रे, सारलेला क्षण, भाऊचा धक्का, माझ्या गजानना, बाप्पा, खत आया है या म्युजिक व्हिडीओ तसेच चित्रपटासाठी त्याने दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
मलाल या बॉलिवूड चित्रपटात तुषारने नायकाचा मित्र मुन्नाची भूमिका गाजवली होती. याशिवाय सूर राहू दे, हे मन बावरे, हनुमानजी आ रहे हैं त नाटक आणि मालिकेत देखील तो दिसला आहे.