Home /News /entertainment /

अरे, हे तर काहीच नाय; आता पाठक बाईदेखील करणार सूत्रसंचालन

अरे, हे तर काहीच नाय; आता पाठक बाईदेखील करणार सूत्रसंचालन

झी मराठी (Zee Marathi ) 10 डिसेंबरपासून नवा कार्यक्रम 'हे तर काहीच नाय' (He Tar Kahich Nay ) घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना सर्वांच्या लाडक्या अंजली वहिनी म्हणजे पाठक बाई दिसणार आहेत.

  मुंबई, 02 डिसेंबर: झी मराठी (Zee Marathi ) 10 डिसेंबरपासून नवा कार्यक्रम 'हे तर काहीच नाय' (He Tar Kahich Nay ) घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचा नुकताच प्रोमो आऊट झाला आहे. विशेष म्हणजे या प्रोमोमध्ये अप्सरा फेम मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni )काही किस्से सांगताना दिसत आहे. आता या शोच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना सर्वांच्या लाडक्या अंजली वहिनी म्हणजे पाठक बाई दिसणार आहेत. अभिनेत्री अक्षया देवधर(akshaya deodhar )प्रथमच सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने अंजली अर्थातच अक्षयाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. मालिकेने निरोप घेतला आहे. तरी अजूनही लोक या मालिकेची आठवण काढतात. लोकांना आजही राणा-अंजलीची जोडी प्रचंड आवडते. मूळच्या पुण्याच्या असणाऱ्या अक्षयाने कोल्हापूरच्या रांगड्या मातीत या मालिकेचं शूटिंग केलं होतं. ही मालिका कोल्हापूरच्या एका खेडेगावावर आधारित असल्याचं दाखवण्यात आलं होतं. या मालिकेतील 'चालतंय की' सारखे अनेक डायलॉगही प्रसिद्ध झाले होते. वाचा:'पॅन्ट घालायला विसरली का..!' रसिका सुनील हनिमून स्पेशल फोटोवरून होतेय ट्रोल, पाहा Photo मालिकेतील राणाने अर्थातच हार्दिक जोशीने नव्या मालिकेसह पुनरागमन केलं आहे. आता अंजली म्हणजेच अक्षया देवधरही या नव्या कार्यक्रमाच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यासंबंधीचं वृत्त मराठी सिरियल या इन्स्टा पेजने दिली आहे. 'हे तर काहीच नाय' या कार्यक्रमाच्या निमित्ताने अतरंगी किस्स्यांची मैफिल झी मराठी वर रंगणार आहे. ज्यामध्ये विशेष अतिथी म्हणून असतील सिद्धार्थ जाधव आणि सैराट फेम तानाजी गलगुंड आणि त्याच सोबत तुझ्यात जीव रंगला फेम पाठक बाई अर्थात अक्षया देवधर प्रथमच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सोबतच अनेक सरप्राइझेस ह्या शो च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येतील.
  झी मराठीने अधिकृत इन्स्टावर हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, अप्सरासुद्धा किस्से सांगण्यात पुढे हाय.नवा कार्यक्रम 'हे तर काहीच नाय' 10 डिसेंबरपासून शुक्र ते शनि रात्री.9:30 वाजता. मात्र कार्यक्रम सुरू होण्याआधी ट्रोल होऊ लागला आहे. कमेंट करत लोकांनी नापसंदी दर्शवली आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, एकदम भंगार विनोद तर दुसऱ्याने म्हटलं आहे की,झी खरच पांचट झालंय तर आणखी एकाने म्हटलं आहे की, हे असले जोक बगत बसण्या पेक्षा कार्टून मधील पेपा पिग बघितलेल बर ते जास्त मनोरंजन आहे. तर आणखी एकाने झी मराठीवरचं थेट निशाणा साधत म्हटलं आहे की,झी चे लेखक दुसऱ्या चॅनल साठी काम करत आहे ..अस वाटत..अशा नकारात्मक कमेंट करून नेटकऱ्यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच कार्यक्रमाला नापसंती दर्शवली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या