मुंबई, 5 जानेवारी- कर्लस मराठीवर (Colors Marthi) ‘तुझ्या रुपाचं चांदणं’ (Tujhya Rupacha Chandana) ही नवीन मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘गरीबाघरी सौंदर्य हा शाप आहे’, अशी या मालिकेची टॅग लाईन आहे. तुझ्या रुपाचं चांदणं या मालिकेची कथा नक्षत्रा अर्थात नक्षी हिच्या भोवती फिरतांना दिसते.या मालिकेत नक्षीची भूमिका अभिनेत्री तन्वी शेवाळे साकारत आहे. आता मालिकेत एक न्यू एंट्री होणार आहे. बिग बॉस मराठी तीन (Bigg Boss Marathi 3) मध्ये सहभागी झालेल्या एका अभिनेत्रीची (Surekha Kudchi) या मालिकेत एंट्री होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. एका पोर्टलने याबद्दल वृत्त दिलं आहे. बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सुरेखा कुडची या मालिकेत दिसणार आहेत. त्यांच्या भूमिकेविषयी अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही. तसेच सुरेखा यांनी देखील सोशल मीडिया पोस्ट करत लवकरच भेटूय नव्या भूमिकेत असं म्हणत चाहत्यांना देखील हिंट दिली आहे. वाचा- अभिनेता अंकुश चौधरीला कोरोनाची लागण ; ट्विट करत दिली माहिती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना नवा प्रोजेक्ट मिळाला आहे. सुरेखा कुडची या त्यांची मुलगी जान्हवी हिच्या आग्रहाखातर मराठी बिग बॉसच्या सीजनमध्ये सहभागी झाल्या होत्या. या घरात त्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरल्या. स्नेहा वाघ तसेच विशाल निकय व घरातील इतर स्पर्धाकांशी देखील त्यांचे चांगले संबंध होते.
सुरेखा कुडची यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात लावणी नर्तिका म्हणून केली. अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी हळूहळू अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. सुरेखा कडची यांनी मराठीबरोबरच हिंदी सिनेमा, मालिकांतही काम केले आहे. वाचा- ‘Bigg Boss Marathi’ फेम उत्कर्ष शिंदे लवकरच दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत सासुची माया, पोलिसाची बायको, भरत आला परत, खुर्ची सम्राट, तीन बायका फजिती ऐका, फॉरेनची पाटलीण या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले आहे. तसेच देवयानी, रुंजी, नवरी मिळे नव-याला, चंद्र आहे साक्षीला, स्वाभिमान या मालिकेतही त्यांनी काम केले होते. आता त्या कर्लस मराठीवरील ‘तुझ्या रुपाचं चांदणं’ या मालिकेत दिसणार आहेत.