Home /News /entertainment /

'तू तेव्हा तशी' मालिकेतील चंदू चिमणे आहे तरी कोण..अभिनयासाठी सोडली बॅंकेची नोकरी

'तू तेव्हा तशी' मालिकेतील चंदू चिमणे आहे तरी कोण..अभिनयासाठी सोडली बॅंकेची नोकरी

'तू तेव्हा तशी' ( tu tevha tashi )मालिकेत अनामिका आणि तिचा कॉलेजचा मित्र चंदू चिमणे याची पहिल्याच भागत भेट घडते. आज आपण चंदू चिमणेच्या (kiran bhalerao ) खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहे.

    मुंबई, 27 मार्च- झी मराठी वाहिनीवर 'तू तेव्हा तशी' ( tu tevha tashi )  ही नवी मालिका नुकतीच सुरू झाली आहे. मालिकेत अनामिका आणि सौरभच्या राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मालिकेत शिल्पा तुळसकर, स्वप्नील जोशी, अभिषेक रहाळकर, अभिज्ञा भावे, सुनील गोडबोले, उज्वला जोग, सुहास जोशी आणि मीरा वेलणकर, रुमानी खरे, विकास वर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मालिकेत अनामिका आणि तिचा कॉलेजचा मित्र चंदू चिमणे याची पहिल्याच भागत भेट घडते. पहिल्याच भेटीत चंदू चिमणे प्रेक्षकांना खूप आवडलेला आहे. आज आपण चंदू चिमणेच्या (kiran bhalerao ) खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहे. चंदू चिमणेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव किरण भालेराव असं आहे. किरण भालेरावकॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटकांमध्ये काम करत आले आहेत. यानंतर किरण याने बॅंकेत नोकरी लागली. मात्र बॅंकेच्या नोकरीत त्याचे काही मन रमले नाही. अभिनयाची आवड त्यांना गप्प बसू देत नव्हती. शिवाय नोकरी करत असताना सारख्या रजा मागणं देखील शक्य नव्हते. एकदा एका प्रोजेक्टसाठी त्याने अशीच एक ऑडिशन दिली होती. त्यावेळी त्यांना अमरावतीला बोलावले होते. मात्र आता रजेसाठी कारण काय द्यायचे हा मोठा प्रश्न समोर उभा होता. शेवटी बँकेच्या नोकरीला रामराम ठोकून त्यांनी पूर्णवेळ अभिनयात करिअर करण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी 2009 साली झी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमध्ये सहभाग घेतला. या शोमुळे किरणला अमाप प्रसिद्धी मिळाली. यानंतर किरणला कलर्स मराठीवरील गणपती बाप्पा मोरया या मालिकेत नंदी महाराजांची भूमिका मिळाली. त्याने साकारलेला नंदी महाराज प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. झी मराठीच्याच बाजी या आणखी एका मालिकेतून तो खंडेराव सरदारची तगडी भूमिका साकारताना दिसला. वाचा- गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना दिसला 'BB' फेम अभिनेता, कपलचा video viral स्टार प्रवाहवरील जिवलगा, सोनी सबवरील मंगलम दंगलम अशा अनेक मालिकेतून त्याने विविधांगी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. तू तेव्हा तशी या मालिकेतून किरण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याची चंदू चिमणेची भूमिका देखील प्रेक्षकांना आवडू लागली आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

    पुढील बातम्या