मुंबई, 21 मार्च- झी मराठीवरील तू तेव्हा तशी मालिकेचा**( Tu Tevha Tashi )** नुकताच पहिलाच भाग प्रदर्शित झाला आहे. झी मराठीनं मालिकेचं जोरदार प्रमोशन केलं आहे. मालिकेचा पहिला भाग ( Tu Tevha Tashi first episode) २० मार्चला प्रदर्शित झाल्यानंतर झी मराठीनं एक पोल घेत मालिकेच्य पहिल्या भागाबद्दल मत विचारलं आहे. या पोलमधून मालिकेबद्दल प्रेक्षकांचे असणारं मत समोर आलं आहे. झी मराठीनं अधिकृत इन्स्टावर तू तशी मालिकेचा पहिला भाग कसा वाटला याबद्दल विचारलं आहे. नेटकऱ्यांनी देखील कमेंट करत मत नोंदवलं आहे. कमेंट वाचल्य़ावर एकच लक्षात येते की, नेटकऱ्यांना तर पहिला भाग आवडलेला आहे. कुणी खूप मस्त तर कुणी खूप छान, जबरदस्त, एक नंबर अशा कमेंट करत मालिकेच्या पहिल्या भागाची प्रशंसा केली आहे. तर एकानं म्हटलं आहे की, शब्दांत व्यक्त करणे अशक्य….तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, सुपर … गाणं तर खूप भारी वाटल मेरे कॉलेज की एक लडकी हैं 😂😂😂…अशा मालकेच्या पहिल्या भागाविषयी कमेंट आल्या आहेत. वाचा- मनोरंजन इंडस्ट्री हादरली! कार अपघातात 26 वर्षीय अभिनेत्रीचा धक्कादायक मृत्यू तर काहींनी मालिकेतील स्त्री भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. एकानं म्हटलं आहे की, फिमेल भूमिका सगळ्या उत्तम आहेत. तर एकानं म्हटलं आहे की, मस्तच होता पहिला भाग!नवऱ्याने फसवणूक केली असली तरी आपल्या कुटुंबाला सांभाळणारी व " मी बाई नसून मुलगी आहे,और मेरा दिल अभी भी जवान है" असं सांगणारी अनामिका दिक्षीत खुप सुंदर होती पण घरची जबाबदारी पेलून थकलेला सौरभ पटवर्धन खूप गंभीर आणि उदास वाटला.
‘तू तेव्हा तशी’ मालिकेत स्वप्निल आणि अभिनेत्री शिल्पा तुळस्कर एक फ्रेश जोडी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेच्या पहिल्याचा भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. वाचा- ‘रंग माझा वेगळा’ फेम दीपिका आहे स्टार किड्स, या अभिनेत्रीची आहे मुलगी कॉलेजमध्ये मैत्री असलेली अनामिका आणि सौरभ यांची कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा भेट घडून येते. अनामिका ही इंटेरिअर डिझाइनर आहे तर सौरभ त्याच्या कामानिमित्त मुंबईला गेलेला असतो. इथेच या दोघांची भेट घडून येते. आपले काम आटोपून हे दोघेही अनामिकाच्या गाडीने पुण्याला येतात. त्यावेळी सौरभने त्याच्या वहिनीसाठी घेतलेलं गिफ्ट अनामिकाच्या गाडीत विसरतो. यामुळे या दोघांची पुन्हा एकदा भेट घडून येणार आहे. या मालिकेत अभिज्ञा भावे, अभिषेक रहाळकर, सुनील गोडबोले आणि सुहास जोशी यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत.