मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

त्रिशाकरचे होते पवन सिंहची संबंध? MMS व्हायरल झाल्यावर केली अशी पोस्ट

त्रिशाकरचे होते पवन सिंहची संबंध? MMS व्हायरल झाल्यावर केली अशी पोस्ट

पवन आणि त्रिशाकरमध्ये देखील संबंध होते का? अशी नवीनच चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली आहे.

पवन आणि त्रिशाकरमध्ये देखील संबंध होते का? अशी नवीनच चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली आहे.

पवन आणि त्रिशाकरमध्ये देखील संबंध होते का? अशी नवीनच चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 22 ऑगस्ट: भोजपूरी अभिनेत्री त्रिशाकर मधू (Trishakar Madhu) सध्या प्रचंड चर्चेत आहे. अलिकडेच तिचा एक खासगी MMS व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला. त्यामुळे तिच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. हा MMS व्हायरल करू नका म्हणून तिने नेटकऱ्यांना आवाहनही केलं. मात्र त्यामुळे व्हिडीओ आणखी चर्चेत आला. या प्रतिकूल परिस्थितीत तिने भोजपूरी अभिनेता पवन सिंहची (Pawan Singh) मदत मागीतली. मात्र यामुळे पवन आणि त्रिशाकरमध्ये देखील संबंध होते का? अशी नवीनच चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्रिशाकरनं फेसबुकद्वारे पवनची मदत मागीतली होती. "तुझ्यासारखा न कोणी होता न कोणी असेल. पवन सिंहजी तुम्ही भोजपूरी सिनेसृष्टीतील महादेव आहात." अशा आशयाची पोस्ट तिने केली होती. यामुळे त्रिशाकर आणि पवनमध्ये संबंध आहेत का? अशी शंका प्रेक्षक घेत आहेत. अनेकजण तर सोशल मीडियाद्वारे हा थेट सवाल पवनला करत आहेत. दरम्यान यावर अद्याप त्याने कुठलेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही.

मधू मंटेनांच्या रामायणात रणबीर कपूर 'राम' तर हृतिक रोशन होणार 'रावण'? पाहा काय आहे चित्रपट

यापूर्वी त्रिशाकर काय म्हणाली होती?

“देव सगळं बघतो आहे. मला खाली आणण्यासाठी माझा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. तुमच्या बहिणीशी कोणी लग्न करून दुसऱ्या दिवशी त्यांच्या सुहागरातचा व्हिडीओ व्हायरल केला तर चांगल वाटेल ना. बिहारमध्ये वाईट लोक आहेत याची कल्पना मला नव्हती.” अशा आशयाची फेसबुक पोस्ट करत तिने ट्रोलर्सवर संताप व्यक्त केला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

First published:

Tags: Entertainment, MMS, Video viral