नाना पाटेकर - वेलकम मधील 'उदय शेट्टी' कोणाला नाही माहीत. मराठी चित्रपटसृष्टीत नाव कमावून नानांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं आणि स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण केलं.परींदा, क्रांतिवीर, तिरंगा, वेलकम हे नानांचे गाजलेले हिंदी चित्रपट आहेत.
स्मिता पाटील - आपल्या नैसर्गिक अभिनयाने चित्रपटरसिकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. श्याम बेनेगल यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अवघ्या काही वर्षांच्याच काळात त्यांनी एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमांमधून अभिनयाचा ठसा उमटवला.
अशोक सराफ - नुकतीच वयाची 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. करण अर्जुन मधले मुन्शीजी, सिंघम मधले हवालदार, कोयला, येस बॉस अशा चित्रपटातून अनेक छोट्या मोठ्या भूमिकांमधून अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली.
रीमा लागू - अभिनेत्री रीमा लागू यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत स्वतःची वेगळी जागा निर्माण केली होती. त्या मुख्यतः आईच्या भूमिकेसाठी ओळखल्या जायच्या. हम आपके है कोन, कुछ कूछ होता है, हम साथ साथ है, वास्तव या नावाजलेल्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
सचिन खेडेकर - अनेक मराठी चित्रपटात अभिनय केलेले सचिन खेडेकर यांचा बॉलिवूड मध्येही बोलबाला आहे. तेरे नाम, अस्तित्व, झिद्दी या चित्रपटांपासून आताच्या सिंघम, रुस्तम यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या.
श्रेयस तळपदे - अभिनेता श्रेयस तळपदेने अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. इकबाल, गोलमाल सिरीज, ओम शांती ओम यांसारख्या चित्रपटातून श्रेयसने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
सोनाली कुलकर्णी - ही एक मराठीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. तिने दिल चाहता है, सिंघम, पोस्टर बॉईज यांसारख्या चित्रपटात काम करत हिंदी सिनेसृष्टीलाही आपल्या अभिनय आणि सौंदर्याने भुरळ घातली.
रेणुका शहाणे- अभिनेत्री रेणुका शहाणे मुख्यतः त्यांच्या हम आपके है कोन चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखल्या जातात. त्यांनी त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटात काम केले.
वर्षा उसगावकर - मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेली चिरतरुण अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर. त्यांनी इंसानियत की देवता या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनतर त्यांनी 90 च्या दशकात अनेक चित्रपटातून मुख्य भूमिकेत काम केले.
सिद्धार्थ जाधव - हे हिंदी चित्रपटांमधून झळकणार नवं नाव. त्याने याआधी गोलमाल, सिम्बा, सूर्यवंशी, राधे अशा चित्रपटातून झळकला आहे. येणाऱ्या काळात तो सर्कस या हिंदी सिनेमात दिसणार आहे.