मुंबई, 16 मार्च: द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाची सिनेमा गृहातील सुरुवात संथ होती, पण वीकेंडला चांगला प्रतिसाद मिळाल्याने चित्रपटाची कमाईही चांगली झाली. बहुतांश ठिकाणी या सिनेमाचे शोज हाऊसफुल जात आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Assam Cm Himanta Biswa Sarma)यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. म्हणजेच राज्य सरकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला हा चित्रपट पाहायचा असेल तर तो हाफ डे घेऊ शकतो. ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या विस्थापनावर आधारित आहे. हिमंत बिस्वा सरमा यांनी असं ट्वीट केलं आहे की, ‘ही घोषणा करताना आनंद होत आहे की आमचे सरकारी कर्मचारी ‘द कश्मीर फाइल्स’ पाहण्यासाठी अर्ध्या दिवसाची स्पेशल सुट्टी घेऊ शकतात. त्यांना केवळ त्यांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना सूचना द्यावी लागेल आणि दुसऱ्या दिवशी तिकिट जमा करावे लागेल.’
Glad to announce that our Govt employees will be entitled for half-day special leave to watch #TheKashmirFiles.
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) March 15, 2022
They will have to only inform their superior officers and submit the tickets the next day. pic.twitter.com/RNQzOk9iCK
दरम्यान आदल्या दिवशी, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह गुवाहाटी येथील थिएटरमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिला आणि सांगितले की काश्मिरी पंडितांचा नरसंहार हा मानवतेवर कलंक आहे. त्यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘काश्मिरी पंडितांचे हत्याकांड आणि पलायन हा मानवतेवरचा कलंक आहे.’
The Kashmiri Pandit genocide & their exodus are a blot on humanity.
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) March 15, 2022
Moved by the heart-wrenching portrayal of their plight in #TheKashmirFiles, which I watched along with my Cabinet colleagues and MLAs of @BJP4Assam & allies.
Kudos @vivekagnihotri & co for holding out the truth pic.twitter.com/Li8deBW9Ld
त्यांनी या पोस्टमध्ये पुढे असं म्हटलं आहे की, ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files Kashmiri Pandits) मधील त्यांच्या दुरवस्थेचे दुरवस्थेचे हृदयद्रावक चित्रण पाहून प्रभावित झालो, जो मी माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि आसाम भाजपच्या आमदारांसह आणि सहयोगींसह पाहिला. सत्य बाहेर आणण्यासाठी विवेक अग्निहोत्रींना धन्यवाद’.