मुंबई, 25 मार्च : लॉकडाऊनदरम्यान घरी बसून आपल्याला कंटाळा येतो पण बॉलिवूडचे स्टार्स या काळात काय करत असतील असा प्रश्न मनात येतो. तर वेगवेगळे सेलिब्रिटी आपआपल्या घरी राहण्याचं आवाहन करत असल्याचे अनेक व्हिडीओ मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सगळे स्टार्सही लॉकडाऊनला सपोर्ट करत आहेत. मात्र ते घरी काय करतात तर नुकताच कतरिनाने आज आणखी एक व्हिडीओ तिच्या फॅन्ससाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे, बॉलिवूडची सुपरस्टर कतरिनाने पहिला दिवशी घरी राहून वेळ घालवण्यासाठी घरातील कामं केली. त्यानंतर तिचा भांडी घासतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तीने भांडी घासताना तिच्या फॅन्सना खास टिप्सही दिल्या होत्या. लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी कतरिनाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आज कतरिनाने आपल्या संपूर्ण घराची छान साफसफाई केली आहे. झाडू फिरवून घर स्वच्छ पुसून घेतलं आहे. ही साफसफाई झाल्यानंतर कतरिना याच झाडूनं बॅटिंग करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमुळे सगळे सेलिब्रिटी आपआपल्या घरी आहेत. त्यांनी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. कतरिनाने आज आपल्या घरी राहून घराची साफसफाई करत घरातील जंतूंना पळवून लावलं आहे.
हे वाचा-‘शमितामुळे मला नेहमीच असुरक्षित वाटत असे’, शिल्पाचा धक्कादायक खुलासा
कतरिनाचा हा व्हिडीओ 1 लाख 317 हजार लोकांनी पाहिला आहे. तिने हा व्हिडीओ बुधवारी संध्याकाळी पोस्ट केला होता. अवघ्या दोन तासांमध्ये 1 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून युझर्सनी तुफान कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 600 वर पोहोचली असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात हा आकडा जवळपास 100 हून अधिक गेला आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक गोष्टी वगळता सर्व बंद ठेवण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनचे ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
हे वाचा-श्रद्धानं मराठीतून दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, शेअर केला तीन पिढ्यांचा फोटो
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.