मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Good News! 'तारक मेहता..' मालिकेतील दयाबेन दुसऱ्यांदा झाली आई, दिशा वकानीला पुत्ररत्न प्राप्त

Good News! 'तारक मेहता..' मालिकेतील दयाबेन दुसऱ्यांदा झाली आई, दिशा वकानीला पुत्ररत्न प्राप्त

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma)मधील दयाबेन उर्फ ​​दिशा वकानी (Disha Vakani) दुसऱ्यांदा आई झाली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma)मधील दयाबेन उर्फ ​​दिशा वकानी (Disha Vakani) दुसऱ्यांदा आई झाली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma)मधील दयाबेन उर्फ ​​दिशा वकानी (Disha Vakani) दुसऱ्यांदा आई झाली आहे.

मुंबई, 24 मे- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma)मधील दयाबेन उर्फ ​​दिशा वकानी (Disha Vakani) दुसऱ्यांदा आई झाली आहे. दिशा वकानीला पुत्ररत्न (good news ) प्राप्त झाला आहे. काही दिवसापूर्वी दिशाला दुसरा मुलगा (babay boy ) झाला आहे. दिशाचा नवरा मयूर आणि तिचा भाऊ अभिनेता मयूर वाकानी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना याबद्दल सांगितलं आहे.

दिशाचा भाऊ हा देखील 'तारक मेहता का उल्टा चष्मा'  या मालिकेत सुंदरलालची भूमिका साकारताना दिसतो. यावेळी तो म्हणाला की, मी पुन्हा एकदा मामा झालो आहे.  2017 मध्ये दिशाला मुलगी झाली होती. आता पुन्हा दिशानं एका मुलाला जन्म दिला आहे. ती पुन्हा एकदा आई झाली आहे. मी यासाठी खूप आनंदी असल्याचे देखील तो यावेळी म्हणाला.

वाचा-'योगी आदित्यनाथ यांचा नेमका हेतू काय..' अभिनेता सुमीत राघवनचे ट्वीट चर्चेत

दिशा वकानीचा नवरा मयूर याबद्दल म्हणाला की, सध्या तर दिशा तिच्या मुलाची काळजी घेण्याता गुंग आहे. लवकरच ती यावर सगळ्यांशी बोलेल.  मागच्या पाच वर्षापासून ती सगळ्यापासून लांब आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma)मध्ये तिनं साकारलेली दयाबेन लोकांच्या मनात आजही तशीच आहे. तिला पुन्हा या शोमध्ये पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

वाचा-एक अभिनेत्री कशाप्रकारे राडा घालू शकते हे पाहाच, तुम्ही असं कधी केलं आहे का?

 2017 पासून दिशा मालिकेपासून  आहे  लांब

तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेतील दयाबेनच्या पात्राला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं होतं. मात्र, दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी प्रसूती रजेनंतर मालिकेचा निरोप घेतला होता. दिशा वकानी सप्टेंबर 2017 पासून ‘तारक मेहता…’ मालिकेपासून लांब आहे.

First published:

Tags: Entertainment, Tv shows