Home /News /entertainment /

'योगी आदित्यनाथ यांचा नेमका हेतू काय..' अभिनेता सुमीत राघवनचे ट्वीट चर्चेत

'योगी आदित्यनाथ यांचा नेमका हेतू काय..' अभिनेता सुमीत राघवनचे ट्वीट चर्चेत

सुमित राघवन याने नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ पोस्ट करत एक ट्वीट केलं आहे. सध्या त्याचे हे ट्वीट चांगलेच चर्चेत आलं आहे.

    मुंबई, 24 मे- मराठी व हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता सुमीत राघवन (Sumit Raghavan ) सोशल मीडियावर विविध विषयावर मत मांडत असतो. सुमित राघवन याने नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (  yogi adityanath  )यांचा एक व्हिडिओ पोस्ट करत एक ट्वीट केलं आहे. सध्या त्याचे हे ट्वीट चांगलेच चर्चेत आलं आहे. अभिनेता सुमीत राघवन याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे. शिवाय त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, रस्ते, स्पीड ब्रेकर, रोड माफियांबाबत बोलताना एखाद्या राज्याच्या प्रमुखाला मी पहिल्यांदाच पाहतोय किंवा ऐकतोय. त्यांचा हेतू नेमका काय आहे हे योगी आदित्यनाथ यांच्या डोळ्यांमधून आणि आवाजामधून स्पष्ट होतं आहे. उगाच कोणतीच बडबड नाही किंवा शब्दांचा कसला खेळ नाही. योगी आदित्यनाथजी तुम्हाला सलाम....असं सुमीतने ट्वीट केलं आहे. सध्या त्याचे हे ट्वीट चांगलेच चर्चेत आलं आहे. सुमितने पोस्ट केलेल्या व्हि़डिओमध्ये योगी आदित्यनाथ म्हणाताना दिसत आहेत की, रस्त्याच्या बाजूला कोणतीच वाहनं उभी करू नयेत. हायवेला तर कित्येक ट्रक रस्त्याच्या बाजूला थांबवलेले असतात. पण असं का होतं?...असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. नियमित पेट्रोलिंग करा. अन्यथा गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करा. एखाद्या ढाब्यावर पार्किंगसाठी जागा नसेल किंवा सोय नसेल तर अशा ढाब्यांवर कारवाई करा..असं योगी आदित्यनाथ या व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहेत. वाचा-समंथा-विजयसोबत घडला अपघात, काश्मीरमध्ये शूटिंगदरम्यान जखमी झाले कलाकार पुस्तकातला ‘फास्टर फेणे’ लहानपणीच छोट्या पडद्यावर साकारणारा अभिनेता ही सुमीत राघवनची पहिली ओळख. नृत्य आणि गाणं शिकणारा सुमीत पुढे हिंदी मनोरंजनसृष्टीत रमला. मराठीत मोजकं, पण दर्जेदार काम करणाऱ्या अभिनेत्यांपैकी सुमित एक आहे. ‘रंग उमलत्या मनाचे’ हे त्याचं मराठी नाटकही गाजलं.मराठी सिनेमांकडे थोडा उशिराने वळलेल्या सुमीतनं इथेही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या