मुंबई, 26 जुलै : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. पण मागच्या काही दिवसांपासून ही मालिका सतत या ना त्या कारणामुळं चर्चेत आहे. मागील काही दिवसात अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. नुसती मालिका सोडलेली नाही तर मालिकेवर काही आरोप लावले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा या मालिकेतून लाडक्या दयाने प्रेक्षकांच्या निरोप घेतला. ‘दयाबेन’ म्हणजेच अभिनेत्री दिशा वाकानी हिने 5 वर्षांपूर्वी मालिकेतून एक्झिट घेतली. पण आजही चाहते तिला विसरलेले नाहीत. आता पाच वर्षानंतर पहिल्यांदाच दयाची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील ‘दयाबेन’ ही व्यक्तिरेखा साकारून वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री दिशा वाकाणी हिने शो सोडल्याला 5 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण आजही चाहत्यांच्या मनात दया जीवंत आहे. 2017 मध्ये दिशा वाकानीने प्रसूतीसाठी रजा घेतली आणि त्यानंतर ती पुन्हा शोमध्ये परतली नाही. मालिकेचा निरोप घेतल्यापासून ही अभिनेत्री लाइमलाइटपासून देखील गायब आहे.
अभिनेत्रीचे चाहते तिला पाहण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहत होते, पण आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. दिशा वाकाणीची अलीकडेच एक झलक पाहायला मिळाली. नुकतीच ‘दयाबेन’ उर्फ अभिनेत्री दिशा वाकानी तिच्या एका चाहत्याला भेटली होती. या जोडप्याने अभिनेत्रीसोबत झालेल्या भेटीचा ब्लॉग बनवला असून तो यूट्यूबवर शेअरही केला आहे. यूट्यूबवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अभिनेत्री पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसत आहे. अक्षय कुमारचा ‘OMG 2’ अडचणीत; चित्रपटावरील तब्बल 20 दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री दयाबेन या व्हिडिओमध्ये मेकअपशिवाय दिसत आहे. तिचा लूक खूपच वेगळा दिसत आहे. मेकअपशिवाय अभिनेत्रीला ओळखणं देखील कठीण झालयं. तिने पिवळ्या रंगाचा टॉप आणि निळी पॅन्ट घातली आहे. व्हिडिओमध्ये ती पूर्णपणे वेगळी दिसत आहे. तिला ओळखणं फार कठीण आहे. तिने चाहत्यांसोबत फोटोही काढले. तिचं हसणं आजही तसंच निखळ आणि चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणारं आहे. ती चांगली स्टार अभिनेत्री असली तरी तिची साधी शैली चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या व्हिडिओत दिशाचे चाहते तिला भेटवस्तूही देत आहेत. पण ते घेण्यास दिशाने नकार दिला, पण नंतर चाहत्यांच्या सांगण्यावरून ती गिफ्ट स्वीकारते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये दिशा त्या चाहत्याला तिचा चेहरा मोबाईलमध्ये एडिट करायला सांगून मेकअप वगैरे करायला सांगते. याशिवाय दिशाने व्हिडीओमध्ये ‘मला दोन मुलं असल्यामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही.’ असं देखील म्हटलं आहे. दिशा वाकानीला एवढ्या वर्षांनी पाहून चाहते मात्र खुश झाले आहेत.