• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • खासदार Nusrat Jahan यांनी दिली Good News! अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

खासदार Nusrat Jahan यांनी दिली Good News! अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

Nusrat Jahan

Nusrat Jahan

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) यांनी मुलाला जन्म दिला आहे.

  • Share this:
    कोलकाता, 26 ऑगस्ट: बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) यांनी मुलाला जन्म दिला आहे. गेल्या काही दिवपासून चर्चेत असलेल्या नुसरत यांना बुधवारीच रुग्णलयात भरती करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रेगनन्सीचीही विशेष चर्चा रंगली होती. कोलकातामधील Neotia या रुग्णालयात नुसरत यांना 25 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आलं होतं. अभिनेता यश दासगुप्ताने नुसरत यांना रुग्णायलामध्ये भरती केल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान नुसरत यांनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यांना एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मीडिया अहवालानुसार, सध्या नुसरत यश दासगुप्ता (Yash Dasgupta) याच्यासह रिलेशनशिपमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार नुसरतने डॉक्टर्सना खास विनंती केली होती की, डिलिव्हरीवेळी यश तिच्यासोबत असावा. दरम्यान काही महिन्यांपूर्वी नुसरत आई होणार असल्याचं समजलं होतं. त्यानंतर तिचा पूर्व पती निखिल जैन (Nikhil Jain) आणि नुसरत यांचा वाद माध्यमांसमोर आला होता. हे वाचा-Drug case मध्ये अडकला 'भल्लालदेव'; राणा दग्गुबाती, रकुलप्रीत सिंहची आता चौकशी नुसरत यांचं लग्न 2019 मध्ये निखिल जैनशी झालं होतं. तुर्कीमध्ये दोघांनी धुमधडाक्यात लग्न केलं होतं. काही मोजक्या व्यक्ती या लग्नाला उपस्थित होत्या. त्यानंतर भारतात त्यांनी जंगी सेलिब्रेशन करत रिसेप्शन दिलं होतं. त्यामध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या. मात्र वर्षभरातच दोघांमध्ये विवाद सुरू झाले. विवादानंतर नुसरतने हे लग्नच अमान्य केलं होतं आणि आम्ही पती पत्नी नसल्याचं म्हटलं होतं. नुसरत यांनी हे लग्न बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांचा हा वाद देशभरात रंगला होता.
    View this post on Instagram

    A post shared by Nusrat (@nusratchirps)

    नुसरत यांनी बुधवारी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी प्रकृती स्वास्थ्याबाबत विचारणा केली होती.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: