जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Prathamesh Parab: दगडू पोहोचला थेट दिल्लीच्या रेड लाईट एरियामध्ये, प्रथमेशचा 'तो' किस्सा चर्चेत

Prathamesh Parab: दगडू पोहोचला थेट दिल्लीच्या रेड लाईट एरियामध्ये, प्रथमेशचा 'तो' किस्सा चर्चेत

Prathamesh Parab: दगडू पोहोचला थेट दिल्लीच्या रेड लाईट एरियामध्ये, प्रथमेशचा 'तो' किस्सा चर्चेत

टाईमपासच्या तिसऱ्या भागात दिसून येणारा दगडू अर्थात प्रथमेश परब रेड लाईट एरियामध्ये जाऊन आल्याने चर्चेत आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 17 जुलै: टाईमपास या सिनेमामुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. प्रथमेश टाईमपास सिनेमामध्ये दगडू परब हे भन्नाट पात्र साकारतो ज्याने तरुणांमध्ये त्याला बरीच लोकप्रियता मिळाली. नेहमीच आपल्या अभिनयाने चाहत्यांचा लाडका ठरलेला दगडू एकदा रेड लाईट एरियामध्ये सुद्धा जाऊन आला आहे. सध्या प्रथमेश वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत असतो. मागच्या काळात प्रमोशनसाठी चक्क तो रस्त्यावर डान्स करत होता. सध्या प्रथमेश दिल्लीच्या रेड लाईट एरियामध्ये जाऊन आल्याची बरीच चर्चा होताना दिसत आहे. स्वतः प्रथमेशने (prathamesh parab news) याबाबत खुलासा केला होता. त्याच्या ‘अन्य’ या सिनेमासाठी त्याने या एरियाला भेट दिल्याचं समोर आलं आहे. त्याचा हा सिनेमा नुकताच रिलीज झाला असून त्यात त्याचा एकदम रावडी अंदाज बघायला मिळत आहे. यामध्ये त्याच्यावर हेरगिरी करायचं काम सोपवण्यात आलं होतं आणि त्याचाच अभ्यास करण्यासाठी दिल्लीच्या अशा भागात जाऊन त्याने भूमिकेचा अभ्यास केल्याचं समोर येत आहे. हा सिनेमा काही घातक रॅकेटचा पर्दाफाश कसा होतो या कथानकावर आधारित आहे. या सिनेमात अतुल कुलकर्णी, भूषण प्रधान हे मराठी कलाकार सुद्धा आहेत. हे ही वाचा-  Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीकडे पण गुड न्यूज? ड्रेसकोडवरून देतेय हिंट प्रथमेश सध्या टाईमपास च्या तिसऱ्या भागात पुन्हा एकदा बिनधास्त अंदाजात दगडू हे पात्र साकारणार आहे. यावेळी दगडूच्या आयुष्यात प्रेमाची पालवी घेऊन पालवी पाटील हे पात्र येणार आहे जे हृता दुर्गुळे साकारताना दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला ज्यावर प्रचंड प्रेम चाहते करताना दिसत आहेत. आता दगडू आणि पालवीची लव्हस्टोरी बघायला प्रेक्षक उत्सुक झाले असल्याचं कळून येत आहे.

जाहिरात

सध्या प्रथमेश करिअरमध्ये वेगळ्याच उंचीवर असल्याचं दिसून येत आहे. त्याचे लागोपाठ अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. येत्या काळात प्रथमेश टकाटक 2, द्रिश्यम 2 अशा अनेक सिनेमात दिसून येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात