मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

2 नं. लवचा 1 नं. लोचा Timepass 3 बॉक्स ऑफिसवर हिट; चार दिवसात इतक्या कोटींची कमाई

2 नं. लवचा 1 नं. लोचा Timepass 3 बॉक्स ऑफिसवर हिट; चार दिवसात इतक्या कोटींची कमाई

दगडू आणि पालवीच्या 2 नंबर लव्हचा 1 नंबर लोचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला आहे. सिनेमानं 4 दिवसातंच कोटींची कमाई केलीय.

दगडू आणि पालवीच्या 2 नंबर लव्हचा 1 नंबर लोचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला आहे. सिनेमानं 4 दिवसातंच कोटींची कमाई केलीय.

दगडू आणि पालवीच्या 2 नंबर लव्हचा 1 नंबर लोचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला आहे. सिनेमानं 4 दिवसातंच कोटींची कमाई केलीय.

मंबई, 03 ऑगस्ट: संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन करण्यासाठी 'टाइमपास 3' हा सिनेमाचा 29 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.  'टाइमपास' आणि 'टाइमपास 2' च्या प्राजू आणि दगडूच्या अनोख्या लव्ह स्टोरीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. प्राजूबरोबर लग्न होण्याआधी दगडूच्या आयुष्यात आलेल्या 'पालवी'ची गोष्ट टाइमपास 3 मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांचा धिंगाणा प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडला आहे.  2 नंबर लवचा 1नंबर लोचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला आहे. 29 जुलै रोजी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमानं अवघ्या चार दिवसात 4.36 कोटींची दमदार कमाई केली आहे. ' टाइमपास 3' च्या या कमाईनं फुल्ल धुमाकूळ घातला आहे.  या आठवड्यात सिनेमा आणखी तगडी कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सिनेमाला मिळत असलेलं यश पाहून सर्वांना सिनेमाच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक केलं आहे.

मराठी सिनेसृष्टीतील अवघ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजे दगडू आणि प्राजू. प्रेक्षकांनी ‘टाइमपास १’ आणि ‘टाइमपास २’ मधील दगडू आणि प्राजूच्या अनेख्या  लव्हस्टोरीला प्रचंड उत्तम प्रतिसाद देत आहेत.  'टाइमपास ३' नेही प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत.या आठवड्यातही टाइमपास 3 ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु आहे.  पालवीची डॅशिंग, लव्हेबल अदा, दगडूची जबरदस्त कॉमेडी  आणि त्यात भर म्हणून दगडूची गँग प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.  केवळ प्रेक्षकच नाही तर अनेक कलाकार आणि सोशल मीडिया स्टार्सनंही सिनेमाचं कौतुक केलं आहे. सध्या कलाकारांचे ते व्हिडीओ देखील चांगलेच व्हायरल होत आहेत.

हेही वाचा - Amruta Fadanvis: 'मला मामी हाक मारल्यावर फारच मज्जा येते'; बस बाई बसच्या मंचावर अमृता फडवीसांनी स्पष्टच सांगितलं

झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी यांनी सिनेमाला मिळालेल्या या यशविषयी कौतुक करत म्हटलं, 'अवघ्या 4 दिवसांमध्ये 4.36 करोडची कमाई करून बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. सध्या हिंदी सिनेमाचा प्रेक्षकांवर पडलेला प्रभाव बघता दगडू आणि पालवीच्या प्रेमाला प्रेक्षकांचा इतक्या कमी दिवसांत इतका  उत्साहजनक प्रतिसाद पाहून अभिमान वाटतो. सिनेमा चांगला असल्यावर प्रेक्षकसुद्धा तो चित्रपट डोक्यावर घेतात, तसाच हा सिनेमा आहे. ज्याला सध्या प्रेक्षकांच्या उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 'टाईमपास १' आणि 'टाईमपास २' ला जितका प्रतिसाद मिळाला तितकाच प्रतिसाद प्रेक्षक 'टाईमपास ३'ला ही देत आहेत. सिनेमा पाहून समीक्षक आणि प्रेक्षकांच्या देखील सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत'.

दरम्यान टाइमपास 3 सिनेमा काहीसा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. सिनेमात हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असं एका सीनमध्ये दाखवण्यात आलं होतं. त्यावरुन मराठी एकीकरण समितीनं आक्षेप घेऊन सिनेमातील ती दृश्य तातडीने काढून टाकण्याची मागणी केली होती. तसंच दिग्दर्शकांनी माफी मागावी असंही त्यांनी म्हटलं होतं.

First published:

Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Time pass marathi movie