Home /News /entertainment /

Heropanti 2 चा ट्रेलर OUT, नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार 'लैला'च्या भूमिकेत, VIDEO

Heropanti 2 चा ट्रेलर OUT, नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार 'लैला'च्या भूमिकेत, VIDEO

Heropanti 2

Heropanti 2

हिरोपंती 2,(Heropanti 2) टायगर श्रॉफचा (Tiger Shroff)पहिला चित्रपट हिरोपंतीचा सिक्वेल यावर्षी ईदच्या मुहूर्तावर 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील टायगर श्रॉफचा पहिला लूक समोर आला असून नुकतांच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 17 मार्च:  हिरोपंती 2,(Heropanti 2) टायगर श्रॉफचा (Tiger Shroff)पहिला चित्रपट हिरोपंतीचा सिक्वेल यावर्षी ईदच्या मुहूर्तावर 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील टायगर श्रॉफचा पहिला लूक समोर आला असून नुकतांच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत तारा सुतारिया (Tara Sutaria) वदिसणार आहे. 'हीरोपंती 2' (Heropanti 2) हा चित्रपट 29 एप्रिल 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 3 मिनिटे 20 सेकंदाचा हा ट्रेलर असून तारा सुतारियाचा अंदाच खुपच सुंदर दिसत आहे. तसेच, या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीदेखील (Nawazuddin Siddiqui) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात टायगर श्रॉफ बबलूचे पात्र साकारणार असून नवाजुद्दीन सिद्दीकी लैलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 2014 साली 'हीरोपंती' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या माध्यमातून टायगर श्रॉफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 'हीरोपंती 2' सिनेमातील नवाजचा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. नुकताच नवाजचा 'नूरानी चेहरा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. नवाजच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून नेहमीच कौतुक होत असते. 'हीरोपंती 2' चित्रपटात प्रेक्षकांना नवाजचा दर्जेदार अभिनय पाहायला मिळणार आहे. बागी आणि बागी 3 चे दिग्दर्शक अमजद खान यांनी या देखील चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. लक्षणीय बाब म्हणजे या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अजय देवगनच्या रनवे 34 या चित्रपटाशी टक्कर होणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत तारा सुतारिया दिसणार आहे. स्टुडंट ऑफ द इयर २ या चित्रपटानंतर तारा आणि टायगर श्रॉफ पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. आगामी हिरोपंती २ या चित्रपटात चाहत्यांना जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे.

  2०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता हिरोपंती 

  हिरोपंती चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना टायगर श्रॉफने लिहले की, "ॲक्शन, स्वॅग आणि हिरोपंती सगळ्यांना येत नाही, आणि माझी जात नाही. टायगर श्रॉफचा हिरोपंती चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत क्रिती सेनन होती. 25 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 72.6 कोटींचा व्यवसाय केला. चित्रपटाचा निर्माता साजिद नाडियादवाला याला सलमान खानने जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफला लॉन्च करण्यास सांगितले होते. टायगर श्रॉफने 2012 मध्ये हा चित्रपट साइन केला होता. हिरोपंती २ व्यतिरिक्त टायगर श्रॉफ गणपत चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावर टीझर व्हिडिओ शेअर करताना टायगर श्रॉफने लिहले की, "हा माझ्यासाठी आणि खासकरून तुमच्यासाठी सादर करत आहोत. #गणपत अधिक ॲक्शन, थ्रिल आणि मजेसाठी सज्ज.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Bollywood, Entertainment, Tiger Shroff

  पुढील बातम्या