मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /एकमेकींचं तोंडही पाहात नव्हत्या या बहिणी, सिनेमांमधून काढण्याचाही केलेला प्रयत्न; राणी आणि काजोलमध्ये काय होता वाद?

एकमेकींचं तोंडही पाहात नव्हत्या या बहिणी, सिनेमांमधून काढण्याचाही केलेला प्रयत्न; राणी आणि काजोलमध्ये काय होता वाद?

काजोल-राणी मुखर्जी

काजोल-राणी मुखर्जी

Kajol-Rani Mukherji Fight: बॉलिवूडमध्ये बहीण-भावांच्या अनेक जोड्या पाहायला मिळतात. त्यातीलच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी होय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 19 मार्च- बॉलिवूडमध्ये बहीण-भावांच्या अनेक जोड्या पाहायला मिळतात. त्यातीलच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी होय. या दोघी चुलत बहिणी आहेत. या दोघींबाबत नेहमीच काही ना काही बातम्या समोर येत असतात. दरम्यान आता काजोलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बहीण तनिषा मुखर्जी, चुलत बहीण-अभिनेत्री राणी मुखर्जीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिघीही ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहेत. यासोबतच काजोलने राणीचा नुकताच प्रदर्शित झालेला 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' हा चित्रपट पाहून तिचा खास रिव्ह्यू दिला आहे.

बहीण राणी मुखर्जीच्या सिनेमाबाबत सांगताना काजोलने लिहलंय, ''आवर्जून बघायला हवा'. राणी आणि काजोलमधील उत्तम बाँडिंग या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. पण एक वेळ अशी होती, जेव्हा या दोघींना एकमेकांचा चेहरा पाहणंही पसंत नव्हतं. इतकंच नव्हे तर, काजोलने राणीला सुपरहिट चित्रपट 'कुछ कुछ होता है' मधून बाहेर करण्याचाही प्रयत्न केला होता.

(हे वाचा: शेहनाज गिलने सारा अली खानला लिप टू लिप केलं KISS; सोशल मीडियावर चर्चेला उधाण)

राणी मुखर्जीने ज्यावेळी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. तेव्हा काजोल बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री बनली होती. काजोल आणि राणी चुलत बहिणी आहेत.या दोघींचे वडी शोमू मुखर्जी आणि राम मुखर्जी चुलत भाऊ होते. लोकांना वाटायचं की, काजोल सिने करिअरमध्ये आपली चुलत बहीण राणीला मदत करेल. आणि तिला इंडस्ट्रीत मार्गदर्शन करेल. प असं कधीच झालं नाही. उलट काजोलने तिच्या करिअरमध्ये अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं.

काजोल-राणीमध्ये काय होता वाद?

काजोल आणि राणी मुखर्जी यांच्यातील मतभेदाचं कारण हे कौटुंबिक वाद होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही कुटुंबात संपत्तीचा वाद सुरु होता. सुरुवातीला यशराज फिल्म्सच्या यश चोप्रा यांची आवडती अभिनेत्री काजोल होती. नंतर हळूहळू तिची जागा राणी मुखर्जीने घेतली तेव्हा दोघींमधील संघर्ष वाढला होता. यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्रा या प्रोडक्शन हाऊसमध्ये आल्यानंतर राणी मुखर्जी यशराज फिल्म्सची नवीन आवडती अभिनेत्री बनली होती.

असंही सांगितलं जातं की, अनेक वर्षांपासून आदित्य चोप्रा राणीच्या प्रेमात वेडा होता. त्यामुळे राणी मुखर्जी आणि काजोल यांच्यातील वाद आणखीनच वाढला होता. जेव्हा करण जोहरने राणीला काजोल आणि शाहरुखसोबत 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात कास्ट केलं. तेव्हा काजोल चांगलीच नाराज झाली होती. आणि राणीच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यासाठी करणवर दबाव आणला होता. परंतु इतक्या वर्षानंतर या दोघींमध्ये आता सर्वकाही ठीक आहे.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Rani Mukharjee