मुंबई,15 मार्च- बॉलिवूड मध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये दमदार सुरुवात केली मात्र ते अचानक इंडस्ट्रीमधून गायब झाले. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे सुमित सेहगल होय. सुमीत सेहगने 1987 मध्ये ‘इन्सानियत के दुश्मन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्याच्यासोबत संजय दत्त, गोविंदा आणि मिथुन चक्रवर्तीसारखे मोठे कलाकार होते. या चित्रपटाने 80 च्या दशकात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. चित्रपटातील सुमितचा अभिनय आणि त्याचा लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. मोजक्याच पण चांगल्या सिनेमांतून भेटीला आलेला सुमित सेहगल गेल्या बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सिनेसृष्टीला कायमचा रामराम ठोकलेला सुमित सेहगल बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री तब्बूचा भावोजी आहे. सुमित सेहगलच लग्न तब्बूची बहिण फराह नाजशी झालं आहे. (हे वाचा: ‘माझ्या लोकांना पैशांचं आमिष..’, सलमान खानबाबत मोठा दावा करत लॉरेन्स बिष्णोईने खुलेआम दिली धमकी ) बॉलिवूडचा रुपेरी पडदा क्षणार्धात एखाद्याला स्टार बनवतो तर क्षणार्धात एखाद्याला लाइमलाईटपासून दूर करतो. तब्बूचा भावोजी सुमीत सेहगलसोबतही असंच काहीसं झालं आहे. सुमित पहिल्यांदा जेव्हा मोठया पडद्यावर झळकला होता. तेव्हा लोकांनी अक्षरशः त्याला डोक्यावर घेतलं होतं. मात्र काही काळानंतर सुमित अचानक इंडस्ट्रीमधून गायब झाला होता.
2010 मध्ये जेव्हा सुमितने पुनरागमन केले होते, तेव्हा तो पूर्णपणे बदलला होता. त्याला या लुकमध्ये ओळखणंही कठीण झालं होतं. परंतु यावेळी सुमितने निर्माता म्हणून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं होतं. त्याने “रॉक” हा हॉरर चित्रपट तयार केला होता. या चित्रपटात तनुश्री दत्ता आणि उदिता गोस्वामी मुख्य भूमिकेत होत्या. अभिनेता म्हणून अपयशी ठरलेल्या सुमित सेहगलची सुमित आर्ट नावाची कंपनी असून ती डबिंगचं कामही करते. आता या कंपनीतून तो कोट्यावधींची कमाई करतो.
सुमित सेहगलच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, सुमितने दोन लग्न केले आहेत. त्याचं पहिलं लग्न शाहीन बानोसोबत झालं होतं. शाहीन बानो ही तिच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहीन बानो ही सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड आहे. या सुमित आणि शाहीनला एक मुलगीही आहे. लग्नाच्या १३ वर्षानांतर त्यांनी घटस्फोट घेतला होता. त्यांनंतर सुमीत सेहगलने तब्बूची बहीण फराह नाजसोबत लग्न केलं होतं.