जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'माझ्या लोकांना पैशांचं आमिष..', सलमान खानबाबत मोठा दावा करत लॉरेन्स बिष्णोईने खुलेआम दिली धमकी

'माझ्या लोकांना पैशांचं आमिष..', सलमान खानबाबत मोठा दावा करत लॉरेन्स बिष्णोईने खुलेआम दिली धमकी

सलमान खान

सलमान खान

Lawrence Bishnoi On Salman Khan: पंजाबी गायक, काँग्रेस नेता सिद्धू मुसेवालाची गेल्यावर्षी गोळ्या झाडून निर्घुर्ण हत्या करण्यात आली होती. गायकाच्या हत्येनंतर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ माजली होती.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 मार्च- पंजाबी गायक, काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला ची गेल्यावर्षी गोळ्या झाडून निर्घुर्ण हत्या करण्यात आली होती. गायकाच्या हत्येनंतर सलमान खान ला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ माजली होती. सिद्धू मुसेवालानंतर सलमान खानच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती समोर आल्याने सर्वानांच धक्का बसला होता. अभिनेत्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा लॉरेन्स बिष्णोईने सलमान खानला उघड धमकी देत खळबळ माजवली आहे. सिद्धूच्या आधीच लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला संपवण्याची योजना आखल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी सतत तपास कार्य सुरु ठेवला आहे. पंजाबी रॅपर-गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गुंडांनी अभिनेता सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.नुकतंच ‘एबीपी माझा’ने घेतलेल्या मुलाखतीत लॉरेन्स बिष्णोईने धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच सलमान खानला धमकीचं पत्र पाठवलं होतं का या प्रश्नाचं उघड उत्तर दिलं आहे. (हे वाचा: …म्हणून सिद्धू मुसेवालाला मारलं; तुरुंगातून लॉरेन्स बिष्णोईचा मोठा गौप्यस्फोट ) या मुलाखतीत लॉरेन्स बिष्णोईने सांगितलं आहे, ‘आमच्या संपूर्ण समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे. तो नेहमी आमच्या समाजाला कमी लेखतो. माझ्या समाजात प्राणी आणि झाडांचा जीव घेण्यास सक्त मनाई आहे. त्यांना आम्ही कधीही ईजा पोहोचवत नाही. मात्र सलमान खानने आमच्या इथे येत काळवीटाची शिकार केली होती. सलमान खानवर केस सुरु असूनही त्याने अजून आमच्या समाजाची माफी मागितलेली नाहीय’. लॉरेन्स बिष्णोई पुढे म्हणाला, ‘मी लहान असल्यापासून त्याच्यावर माझा प्रचंड राग आहे. मला त्याचा घमंड मोडायचा आहे. त्याने आमच्या लोकांना पैशांचा आमिष दिला होता. सलमान खानने आमच्या मंदिरात येऊन माफी मागायला हवी. माझ्या समाजाने त्याला माफ केल्यास, माझा त्याच्याशी काहीही संबंध राहणार नाही.कोणत्याही लोकप्रियतेसाठी नाही ठोस कारणामुळे आम्ही त्याला मारणार आहोत’.. असा खळबळजनक दावा लॉरेन्सने केला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

शिवाय सलमान खानला धमकीचं पत्र तू लिहला होतास का? या प्रश्नावर त्याने नाही असं उत्तर दिलं आहे. इतकंच नव्हे तर आपण त्याला पत्र लिहून नव्हे तर थेट जाऊन उत्तर देणार असल्याचं धक्कादायक विधान केलं आहे’. लॉरेन्स बिष्णोईच्या या जबाबाने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात