2021 चं हे वर्ष आता काही दिवसांनी संपणार आहे. त्यातच यावर्षी कोरोनाकाळात फारसे चित्रपट जरी प्रदर्शित झालेले नसले तरी या वर्षी जे स्टारकास्ट असलेले चित्रपट आले त्यातले काही फ्लॉप ठरलेले आहे.
दबंग अभिनेता सलमान खानच्या राधे या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. परंतु जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा भाईजानच्या चाहत्यांना तो आवडला नाही. IMDB वर ही या चित्रपटाला फक्त 1 रेटिंग मिळालं होतं.
प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी चा 'तडप' हा पहिला चित्रपट होता. परंतु तो प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्यात अपयशी ठरला. या चित्रपटात अहान शेट्टीसोबत तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहे.
हंगामा 2 च्या माध्यमातून शिल्पा शेट्टीने दीर्घ काळानंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन केलं होतं. पण हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. शिल्पा शेट्टीसोबत या चित्रपटात परेश रावल, मीजन जाफरी हे देखील मुख्य भूमिकेत होते.
अभिनेता सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ स्टारर बंटी और बबली 2 देखील प्रेक्षकांना आवडला नाही. त्यामुळं या चित्रपटाने फारशी कमाई केलेली नाही.
अभिनेत्री परिणीती चोप्राचा 'The Girl on the Train' हा चित्रपट देखील यावर्षी फ्लॉप राहिलेल्या चित्रपटांच्या यादीत सामील आहे.