मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'हा माणूस मला व्हिडीओ सेक्ससाठी ब्लॅकमेल करतोय'; उर्फी जावेदचा मोठा खुलासा, शेअर केला फोटो

'हा माणूस मला व्हिडीओ सेक्ससाठी ब्लॅकमेल करतोय'; उर्फी जावेदचा मोठा खुलासा, शेअर केला फोटो

uorfi javed

uorfi javed

उर्फी जावेदला गेल्या दोन वर्षापासून बलात्काराच्या धमक्या येत आहेत. याशिवाय तिची बदनामी केली जाईल अशा अनेक धमक्या तिला येत आहेत. उर्फीनं आता याविषयी एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे.

  मुंबई, 15 ऑगस्ट : आपल्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असलेली उर्फी जावेद (Uorfi Javed) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. उर्फीला गेल्या दोन वर्षापासून बलात्काराच्या धमक्या येत आहेत. याशिवाय तिची बदनामी केली जाईल अशा अनेक धमक्या तिला येत आहेत. उर्फीनं आता याविषयी एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. पोस्टसोबत तिनं धमक्यांचे पुरावेदेखील शेअर केले आहेत. उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर धमकी देणाऱ्या व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. याशिवाय उर्फीनं काही व्हॉट्सअॅप चॅटही शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये तो व्यक्ती उर्फीला धमकी देत ब्लॅकमेल करत असल्याचं पहायला मिळतंय. उर्फीनं पोस्टमध्ये लिहिलंय की, 'हा व्यक्ती मला गेल्या अनेक दिवसांपासून धमक्या देत आहे. दोन वर्षापूर्वीही माझे फोटो मॉर्फ करुन कोणीतरी व्हायरल केले होते. याबाबत मी 2 वर्षांपूर्वीच पोलिसांत तक्रार केली होती. पोस्ट शेअरही केली होती पण अद्याप त्याविषयी कोणतीही कारवाई झालेली नाही. आता हा व्यक्ती मला सतत ब्लॅकमेल करत आहे, तो मला व्हिडिओ सेक्स करण्यास सांगत आहे. मी असं केलं नाही तर माझे करिअर बरबाद करेल आणि फोटो वेगवेगळ्या बॉलिवूड पेजेसवर शेअर करेल, असं सांगत आहे'.
  View this post on Instagram

  A post shared by Uorfi (@urf7i)

  'मी या सगळ्या प्रकाराविषयी 14 दिवसांपूर्वी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता. याविषयी अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. मी मुंबई पोलिसांबद्दल बरंच ऐकलं आहे, परंतु या प्रकरणाबद्दल त्यांच्या वृत्तीचे मला आश्चर्य वाटते. धमकी देणारा हा व्यक्ती पंजाब फिल्म इंडस्ट्रीमधला आहे. मुक्तपणे फिरणारी ही व्यक्ती समाजासाठी घातक ठरू शकते', असं उर्फीनं म्हटलं. हेही वाचा -  Prajakta Mali: 'आजपासून फोनवर हॅलो बंद, वंदेमातरम सुरू'; स्वातंत्र्यदिनी प्राजक्ताचा मोठा निर्णय दरम्यान, मी या व्यक्तीची बहीण आशना किशोर हिच्यासोबत काम केले आहे आणि तिला याबद्दल सांगितले पण पुरावा पाहूनही तिने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. उर्फीनं या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनाही टॅग केलं आहे. आत पोलीस याविषयी काय पाऊल उचलतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Bollywood, Entertainment, Sexual harrasment, Tv actress

  पुढील बातम्या