'तुम बस हात थामे रखना...' पाठक बाईंनी साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच राणादासाठी केला खास Video शेअर
'तुम बस हात थामे रखना...' पाठक बाईंनी साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच राणादासाठी केला खास Video शेअर
आता साखरपुडयानंतर पहिल्यांदाच अक्षया देवधरनं हार्दिक जोशीसाठी एक रोमॅंटिक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या या दोघांचा हा रोमॅंटिक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मुंबई, 8 मे- तुझ्यात जीव रंगलामधील सर्वांचं लाडकं कपल राणादा आणि पाठक बाई यांचा खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांत (akshaya deodhar hardeek joshi egngagement ) जीव रंगला आहे. या दोघांनी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर साखपुडा केला आहे. या दोघांच्या साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. आता साखरपुडयानंतर पहिल्यांदाच अक्षया देवधरनं हार्दिक जोशीसाठी एक रोमॅंटिक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या या दोघांचा हा रोमॅंटिक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच हार्दिक जोशीसोबतचा एक रोमॅंटिक व्हाडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिने हार्दिकसाठी हा खास तयार केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षयाने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेपासून त्यांच्या साखरपुड्यापर्यंतचे सर्व सुंदर क्षणांचे अनेक फोटो कोलाज केले आहेत. तसंच 'तुम बस हात थामे रखना', हे गाणे बॅकग्राऊंडला सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या दोघांचा हा रोमॅटिक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव या व्हिडिओवर सुरू आहे.
वाचा-'ती आयुष्यभर इतरांसाठी जगली' मिलिंद गवळी यांची 'Mothers Day' स्पेशल पोस्ट चर्चेत
झी मराठी वरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजली बाई आणि राणादा या ऑनस्क्रीन जोडीला खूप लोकप्रियता मिळाली. अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे सेलिब्रिटी कपल आता विवाह बंधनात अडकणार आहे. अक्षय तृतियाच्या मुहूर्तावर या दोघांनी आपल्या साखरपुड्याचे खास फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. चाहत्यांना आता या दोघांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. मात्र याबद्दल त्या दोघांनी कधी सांगितले नव्हते. मात्र आता या दोघांनी साखरपुडा करत दोघांच्या नातं जगजाहीर तर केलं आहेच शिवाय नात्याला नाव देखील दिलं आहे. चाहत्यांना देखील या जोडीला एकत्र पाहून आनंद झाला आहे.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.