टीव्हीचा सर्वात जास्त चर्चेत असणारा शो बिग बॉसचं (Big Boss 15) नव पर्व लवकरत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर यावेळी अनेकांची नाव चर्चेत होती. मात्र काही टीव्ही अभिनेत्रींची नावं फायनल होण्याच्या टप्प्यात असल्याचं म्हटलं जात आहे.
बालिका वधू फेम अभिनेत्री नेहा मारदा (Neha Marda) यावेळी बिग बॉस15 मध्ये दिसणार आहे. अनेकदा बिग बॉसची ऑफर नाकारल्यानंतर आता नेहा बिग बॉसमध्ये येणार असल्याचं म्हटलं जात आहे. नेहा 'बालिका वधू', 'डोली अरमानो की' आणि 'क्यूं रिश्तों में कट्टी बट्टी' या मालिकांमध्ये दिसली होती.
दिव्या अग्रवालने अखेर तीन वर्षांनंतर शोमध्ये येण्यास होकार दिला आहे. दरम्यान याविषयी अद्याप तिने कोणतही वक्तव्य केलेलं नाही.