मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूड आणि वाद हे आता काही नवीन नाही पार पुर्वीपासूनच बॉलिवूड कलाकर आणि त्यांची वादग्रस्त प्रकरणं चर्चेत राहिली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट. महेश भट यांचा आज 71 वा वाढदिवस. महेश भट यांनी आता पर्यंत 'सारांश', 'अर्थ', 'सर', 'सड़क', 'आशिक़ी' आणि 'ज़ख्म' सारखे अनेक हिट सिनेमे दिले. मात्र यापेक्षा त्यांचं खासगी आयुष्यच सर्वाधिक चर्चेत राहिलं. पण यात सुद्धा गाजलेला किस्सा म्हणजे त्याचे स्वतःच्याच मुलाला लिपलॉक किस करताना व्हायरल झालेले फोटो. हा फोटो 90 व्या दशकात खूपच वादग्रस्त ठरला होता.
महेश भट यांचा त्याची मुलगी पुजा भटला लिपलॉक किस करतानाचा एक फोटो व्हायरल झाला आणि सगळीकडेच खळबळ माजली. याचा परिणाम इतका झाला की महेश भट यांना जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा आल्या. लोकांनी त्यांच्यावर भारतीय सभ्यता खराब केल्याचा आणि समाजत चुकीचा संदेश पोहोचवत असल्याचा आरोप लावला. त्यावेळी त्या फोटोवरून प्रचंड वाद झाला आणि महेस भट यांच्यावर प्रचंड टीका झाली.
मिसेस मुख्यमंत्री : लग्नात सुमीनं समरला दिलं 'हे' सरप्राइझ गिफ्ट
जेव्हा सर्व स्तारातून महेश भट यांच्यावर टीका होऊ लागली त्यावेळी महेश भट यांनी यावर आपली प्रतिक्रिया देत हा फोटो खोटा असल्याचं सांगितल. आपण असा कोणताही फोटो काढून घेतालेला नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. पण यामागची रंजक गोष्ट अशी होती की, हा फोटो व्हायरल होण्याच्या काही दिवसच अगोदर महेश भट यांन पुजा भटसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. पुजा जर माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न केलं असतं एका मुलाखतीत म्हटलं होतं.
शादी के साइड इफेक्ट! दीपवीरचा IIFA लुक पाहून तुम्हीही लावाल कपाळाला हात
View this post on Instagram
Look! I can on occasion also do (off) white ; ) #familytime #weddingbells
महेश भट यांनी 20व्या वर्षीच लॉरेन ब्राइटशी लग्न केलं होतं. लग्नानंतर काही दिवसांनी लॉरेननं आपलं नाव बदलून किरण भट असं केलं. या दोघांना 2 मुलं आहेत. पुजा आणि राहुल. मात्र लॉरेन आणि महेश यांचं हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. याला कारण होतं महेश यांचं परवीन बॉबी यांच्याशी असलेलं अफेअर. मात्र परवीन यांच्या आजारपणामुळे महेश तिच्यापासून वेगळे झाले आणि आपल्या पत्नीकडे परत आले.
VIDEO : रानू मंडलनंतर आता या मुलीचा आवाज ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
किरण यांच्याकडे परतल्यानंतरही महेश आणि किरण यांच्या नात्यातील कटुता कमी झाली नाही. ज्यामुळे 1986 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला आणि सोनी राजदान यांच्याशी दुसरं लग्न केलं. सोनी राजदान यांच्यापासून महेश यांना 2 मुली आहेत. आलिया आणि शाहिन. आलियानं आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये स्थान मिळवलं आहे.
===============================================
VIDEO : 'सगळे सण एकत्र आले', खिचडीवाल्या 'करोडपती' बबिता ताडेंशी खास बातचीत
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा