मुंबई, 1 मार्च- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री (Tv Actress) अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) स्टार प्लसच्या नवीन रिअॅलिटी शो ‘स्मार्ट जोडी’ (Smart Jodi) मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. ही जोडी पहिल्याच दिवशी चाहत्यांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरली. शनिवारी या शोचा प्रीमियर झाला यामध्ये अंकिता आणि विकी पहिल्यांदाच टीव्हीवर एकत्र दिसले. शो दरम्यान, नवविवाहित जोडप्याने त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं. त्यांनतर त्यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आकस्मिक मृत्यूनंतर (Sushant Singh Rajput Death) तो काळ त्यांच्या नातेसंबंधांसाठीही किती कठीण होता याबद्दल सांगितलं आहे. अंकिता आणि विकीने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं स्पष्टपणे नाव घेतलेलं नाही. परंतु त्यांच्या बोलण्यावरून सर्वांनाच लक्षात आलं की हा कठीण काळ कोणता होता. विकी जैनने उघड केले की त्यांच्या नात्यासाठी ही कठीण परीक्षा होती. याबद्दल बोलताना तो म्हणाला,- ‘अचानक एक टर्निंग पॉईंट येतो जिथे फक्त आपणच नाही तर संपूर्ण जगाला धक्का बसतो. जे काही घडले ते धक्कादायक आणि अचानक होते. अशी परिस्थिती हाताळण्यास कोणीही तयार होत नाही’.
त्याचवेळी अंकिता लोखंडेनेही सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत बोलताना म्हटलं, ‘एकेकाळी सर्व बाजूंनी मला ट्रोलिंग केलं गेलं. ती म्हणते- ‘एक काळ असा होता की लोकांचे विचार वेगळे होते. माझी सतत चौकशी होत होती. जेव्हा मी उत्तर दिले नाही, तेव्हा ते स्वतःची उत्तरे देत असत. ज्यामुळे विकी आणि माझ्यासाठी खूप समस्या निर्माण झाल्या होत्या’. (हे वाचा: लेक सुहानाला साडीत पाहून आई गौरीलाही भावना झाल्या अनावर, म्हणाली… ) त्यांनतर विकी म्हणाला, ‘अशी परिस्थिती इतक्या धैर्याने हाताळल्याबद्दल मला अंकिताचा अभिमान आहे. त्या काळाने आम्हाला शिकवले की आयुष्य कितीही विस्कळीत असले तरी सोबत असणे गरजेचे आहे.’’ अंकिता लोखंडेने म्हटलं की,‘विकी माझ्या आयुष्यात आला त्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजते’.