मुंबई 10 जुलै**:** एकता कपूरच्या ‘नागिन’ (Naagin) या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पर्ल व्ही पुरी (Pearl V Puri) हा छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. गेल्या काही काळात तो बलात्कार प्रकरणामुळे प्रचंड चर्चेत होता. या प्रकरणी त्याला त्याला काही दिवसांसाठी तुरुंगातही जावं लागलं होतं. (Pearl V Puri rape case) परंतु त्याचे फॅन त्याच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला पाठिंबा दिला. यावरुनच पर्लच्या लोकप्रियतेचा अंदाच आपल्याला येतो. दरम्यान आज त्याचा वाढदिवस आहे. (Pearl V Puri birthday) 32 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आज पर्ल यशाच्या शिखरावर आहे. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल एक काळ असाही होता जेव्हा तो अभिनय करता यावा यासाठी घरातून पळून मुंबईत आला होता. संस्कारी बाबुजींवर झाले बलात्काराचे आरोप; #MeToo मुळे आलोक नाथ बेरोजगार पर्लचा जन्म 1989 साली मध्यप्रदेशमधील एक मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. महर्षी विद्यामंदिर पब्लिक स्कूल, छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर तो आग्रा येथील राजेंद्र स्वरूप पब्लिक स्कूलमध्ये दाखल झाला. त्यानंतर आग्रा येथेच सेंट जॉन्स कॉलेजमध्ये त्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण सुरु असतानाच तो अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेत होता. परंतु त्याच्या अभिनयाला कुटुंबीयांचा विरोध होता. त्याने MBA करुन एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करावी. वेळप्रसंगी विदेशात जाऊन सेटल व्हावं पण अभिनय करण्याचा भानगडीत पडू नये असा सल्ला वारंवार त्याला कुटुंबीय देत होते. ‘सायरा बानो यांचं ते वाक्य ऐकून जीवच गेला असता’; धर्मेंद्र यांनी सांगितला धक्कादायक अनुभव वडिलांच्या आग्रहाखातर त्यानं MBA केलं खरं पण त्यानं नोकरी केली नाही. उलट तो बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी पळून मुंबईत आला. मुंबईत आल्यावर तो अनुपम खेर यांच्या ‘अॅक्टर प्रिपेअर्स’ या अभिनयशाळेत दाखल झाला. दरम्यान त्याला ‘दिल की नजर से खुबसुरत’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ‘रंगरसिया’, ‘मेरी सासु मा’, ‘इस प्यार को क्या नाम दू’ यांसारख्य़ा मालिकांमध्ये लहानमोठ्या भूमिका साकारुन तो अभिनयक्षेत्रात स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत होता. याच दरम्यान त्याला एकता कपूरच्या नागिन या मालिकेची ऑफर मिळाली. या मालिकेमुळे तो यशाच्या शिखरावर पोहोचला. सध्या तो छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.