मुंबई, 24 डिसेंबर- बॉलिवूडची (Bollywood) देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका (Priyanka Chopra) चोप्रा सतत चर्चेत असते. तिचं खाजगी आयुष्य असो किंवा व्यावसायिक ती नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेते. सध्या अभिनेत्री आपल्या हॉलिवूडच्या (Hollywood Movie) ‘मॅट्रिक्स’ (The Matrix Resurrections) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्रीनं या चित्रपटासंबंधी एक इंटरेस्टिंग खुलासा केला आहे. पाहूया ती नेमकं काय म्हणाली… बॉलिवूडमध्ये प्रचंड यश मिळवल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये जबरदस्त धमाका करत आहे. नुकताच हॉलिवूड चित्रपट ‘मॅट्रिक्स’ रिलीज झाला आहे. यामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राचीसुद्धा महत्वाची भूमिका आहे. नुकताच प्रियांकानं दिलेल्या एका मुलाखतीत या चित्रपटासंबंधी एक मजेशीर किस्सा सांगितलं आहे. अभिनेत्रीनं सांगितलं की मी या चित्रपटाची स्क्रिप्ट एका तिजोरीत लपवून ठेवली होती. वाटलं ना आश्चर्य? हो हे खरं आहे. अभिनेत्रीनं चक्क तिजोरीत कोणालाही दिसणार नाही याची दक्षता घेत या चित्रपटाची स्क्रिप्ट लपवली होती.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा नुकतीच, ‘लेट नाईट विथ सेठ मेयर्स’ या टॉक शोमध्ये सहभागी झाली होती. यादरम्यान अभिनेत्रीनं अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. दरम्यान अभिनेत्रीनं आपल्या नुकताच रिलीज झालेल्या ‘मॅट्रिक्स’ चित्रपटाबद्दल एक मजेशीर आठवण सांगताना म्हटलं आहे, ‘मी जेव्हा पहिल्यांदा या चित्रपटाच्या दिग्दर्शिका लाना वाचोव्स्कीला भेटले तेव्हा मी घाबरले होते.त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी आहे. मी भेटल्यानंतर त्यांनी मला एक स्क्रिप्ट दिली. ती नवीनच छापल्याचं दिसत होतं. ती ‘मॅट्रिक्स’ ची स्क्रिप्ट होती. त्यावर माझं नाव लिहिलं होतं. त्यांनी ती स्क्रिप्ट माझ्या हातात देत म्हटलं मॅट्रिक्समध्ये तुझं स्वागत आहे’. हा अनुभव खूपच रॊमंचक होता’. (हे वाचा: प्रियांकाला भेटण्यासाठी तासन् तास वाट पाहायचा लाहनगा? देसी गर्लचा खुलासा ) मी ती स्क्रिप्ट घरी घेऊन आले. मात्र कोणीही पाहणार नाही अशा पद्धतीने ते ठेऊन दिलं. ही स्क्रिप्ट मी एका तिजोरीत लपवून ठेवली होती. नंतर मी ही स्क्रिप्ट माझ्या ब्लॅंकेटच्या आत टॉर्च घेऊन वाचून काढली होती’. या चित्रपटात प्रियांका चोप्रा ‘सती’ ची भूमिका साकारत आहे. प्रियांकाचा हा लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बॉलिवूडचे कलाकार तसेच चाहते प्रियांका चोप्राला या चित्रपटासाठी भरभरून शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्रीनं नुकतंच ‘मॅट्रिक्स’ च्या प्रीमियरमध्ये आपल्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. २२ डिसेंबरला हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रासोबत हॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार आहेत.

)







