जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / The Kapil Sharma Show: कपिल अन् सुनिल ग्रोवरची जोडी पुन्हा हसवणार!

The Kapil Sharma Show: कपिल अन् सुनिल ग्रोवरची जोडी पुन्हा हसवणार!

The Kapil Sharma Show: कपिल अन् सुनिल ग्रोवरची जोडी पुन्हा हसवणार!

चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता जुलैमध्ये एका नव्या रुपात कपिल शर्मा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महत्त्वाची आणि सर्वात आनंदाची बाब म्हणजे या नव्या शोमध्ये कपिल (Kapil Sharma) आणि सुनिल ग्रोवरची (Sunil Grover) जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 16 फेब्रुवारी : प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडणारा कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) काही दिवसांपूर्वीच बंद झाला आहे. शो अचानक बंद झाल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. 31 जानेवारीला हा शो बंद झाल्यानं चाहत्यांची निराशा झालेली असतानाच आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता जुलैमध्ये एका नव्या रुपात कपिल शर्मा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महत्त्वाची आणि सर्वात आनंदाची बाब म्हणजे या नव्या शोमध्ये कपिल (Kapil Sharma) आणि सुनिल ग्रोवरची (Sunil Grover) जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. द कपिल शर्मा शोच्या नव्या सीझनमधून सुनिल ग्रोवरही शोमध्ये वापसी करणार आहे. याआधीही अनेकदा सुनिल ग्रोवर शोमध्ये वापसी करणार असल्याच्या बातम्या आल्या, मात्र ही वापसी झाली नाही. मात्र, यावेळी स्वतः बॉलिवूड भाईजान सलमान खाननं या वादात उडी घेत दोघांना पुन्हा एकत्र आणलं असल्याची माहिती समोर येत आहे. कोईमोई डॉट कॉमनं दिलेल्या रिपोर्टनुसार, सलमान खान कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोवर यांच्यातील वाद मिटवत आहे. सुनिलनं शोमध्ये वापसी करावी यासाठी सलमान सगळे प्रयत्न करत आहे. कारण, कपिल शर्मा शोचे निर्माता इतर कोणी नसून स्वतः सलमान खानच आहे. सुनिल ग्रोवरच्या शोमधील वापसीची बातमी सोशल मीडियावरुन हाती लागली आहे. नुकतंच कपिल शर्माच्या मेकअप आर्टिस्टनं सुनिल ग्रोवरसोबतचा आपला एक फोटो शेअर केला होता. आता जुलैमध्ये शोच्या वापसीनंतर सुनिल ग्रोवरच्या वापसीबद्दल शिक्कामोर्तब होऊ शकेल. सध्या बंद आहे शो- द कपिल शर्मा शो कोरोना महामारीमुळे प्रेक्षकांशिवायच सुरु होता. मात्र, जुलैमध्ये जेव्हा शो पुन्हा एकदा सुरू होईल तेव्हा त्यात पूर्वीप्रमाणंच प्रेक्षकही असतील. कोरोनाचा फटका पूर्ण फिल्म इंडस्ट्रीला बसला आहे. कपिल शर्मा शोमध्येदेखील प्रेक्षकांसोबतच संभाषण मिस झाल्यानं लोकप्रियतेवर याचा परिणाम झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात