Home /News /entertainment /

VIDEO : कपिल शर्माच्या शोमध्ये सोनाली कुलकर्णी संतापली; मराठी येत नसल्यानं घेतली शाळा!

VIDEO : कपिल शर्माच्या शोमध्ये सोनाली कुलकर्णी संतापली; मराठी येत नसल्यानं घेतली शाळा!

'मुंबईत राहतोस आणि मराठी येत नाही' असं म्हणत सोनाली कुलकर्णीने कपिलला सुनावलं. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी(Sonali Kilkarni) आणि प्रसिध्द अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांनी नुकतीच लोकप्रिय शो द कपिल शर्मा शोमध्ये (The Kapil Sharma Show) हजेरी लावली.

पुढे वाचा ...
    मुंबई, 18 डिसेंबर - मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी(Sonali Kilkarni) आणि प्रसिध्द अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांनी नुकतीच लोकप्रिय शो द कपिल शर्मा शोमध्ये (The Kapil Sharma Show) हजेरी लावली. आपल्या आगामी वेबशोच्या प्रोमोशनसाठी ही कलाकार मंडळी कपिलच्या मंचावर आली होती. त्यांच्यासोबत अभिनेता रवीकिशनसुध्दा होता. कपिल शर्मा आपल्या स्टाईलने आलेल्या पाहुण्यांची नेहमी शाळा घेत असतो. मात्र यावेळी काहीसं उलटं झालं. जेव्हा कपिल शर्मानेही या तिघांबरोबर गप्पा मारायला सुरुवात केली. त्यावेळी अचानक सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माची मराठी बोलता येत नाही म्हणून चांगलीच शाळा घेतली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुंबईत राहतोस आणि मराठीत बोलत नाहीस, असे म्हटल्यावर कपिल शर्मानेही त्याच्या नेहमीच्या अंदाजात सोनालीलाही उत्तर देताना दिसला.सोनाली आणि कपिल शर्मा या दोघांचा मराठी भाषेवरुन झालेले संवादाने उपस्थितही हसून हसून लोटपोट होत होते सोनाली कपलिला म्हणताना दिसते आहे की, मी इतके सिनेमे केले पण या शोमध्ये आले नाही. त्यावर कपिल त्याला उत्तर देतो. त्यावर सोनाली म्हणते तुला मराठी येत नाही. जिथे राहतो तिथलं थोडं यायला पाहिजे. मग यावर कपिल त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये पंजाबीमध्ये उत्तर देतो. वाचा-बुर्ज खलिफावर स्थान मिळालेला पहिला मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे सोनाली पुढे म्हणते की, तू जिथे राहतोस तिथली भाषा तुला येत नाही का? त्यानंतर कपिल सोनालीला थोडा शांत करतो आणि म्हणतो की तो तिच्या बोलण्याशी सहमत आहे. कपिल सोनालीला 'मॅम' म्हणतो. यावर सोनाली म्हणते, ' मॅडम नको मला सोनाली म्हणं.' त्याचवेळी कपिलने त्याच्या मजेशीर शैलीत उत्तर दिले, 'ओके बेब्स ऐक.' हे ऐकून सगळे हसू लागतात. हे सगळं गमती गमती चालले आहे. हा (The Kapil Sharma Promo)व्हिडिओ प्रेक्षकांना मात्र आवडला आहे. हा व्हिडिओ पाहून हासू आवरत नाही. सोशल मीडियावरही या व्हिडिओने नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. विनोदी ढंगातला व्हिडीओ असला तरी चाहते मात्र यावर संमिश्र प्रतिक्रीया देतान दिसत आहे. अनेकांनी सोनाली कुलकर्णीचे कौतुकही केले आहे. हे सर्व कलाकार 'व्हिसलब्लोअर'च्या (Whistleblower)प्रमोशनसाठी आले होते. 2013 मध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील व्यापम घोटाळ्यावर याची कथा आधारित आहे. SonyLIV वर प्रदर्शित झाली आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Kapil sharma, Marathi entertainment, Sonalee Kulkarni, Sonali kulkarni, The kapil sharma show

    पुढील बातम्या