मुंबई, 24 एप्रिल : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी शो ‘द कपिल शर्मा शो’ अनेक वर्षांपासून लोकांच मनोरंजन करत आहे. या शो मधून दर आठवड्याला प्रेक्षकांना हास्याचा डोस मिळतो. काही दिवसांपूर्वीच या शोचा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. गेली दहा वर्ष सुरु असलेल्या या शो मधून आजवरअनेक जुन्या कलाकारांनी शोला रामराम ठोकला होता. पण प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे हा शो आजवर चालू आहे. या शो मधून कपिलच्या खूप जवळच्या व्यक्तींनी शो मधून एक्झिट घेतली होती. यामध्ये सुनील ग्रोव्हर, चंदन आणि कृष्णा अभिषेक यांचा समावेश आहे. पण आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या शो मधील एक सदस्य लवकरच पुनरागमन करणार आहे. कपिल शर्मा शो मधील सगळ्यांचंच लाडका सदस्य कृष्णा अभिषेक लवकरच शो मध्ये परतणार आहे. ‘सपना’ लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कमबॅक करणार आहे. होय, कृष्णा अभिषेकने सोमवारपासूनच या शोचे शूटिंग सुरू केले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात शोमधून अचानक गायब झालेल्या कृष्णा अभिषेकने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. यावेळी सपनाची शोमध्ये दमदार एंट्री होणार असल्याचं कॉमेडियनने म्हटलं आहे. कृष्णा म्हणतो की, शोच्या निर्मात्यांशी पैसे आणि कराराशी संबंधित सर्व समस्या सुटल्या आहेत आणि तो शोमध्ये परतण्यासाठी खूप उत्सुक आहे. R Madhavan: ‘अशा चित्रपटांमध्ये काम करणारे खरोखरच मूर्ख…’ आर माधवनने कंगनाबद्दल केलेलं ते वक्तव्य चर्चेत इ टाइम्सशी बोलताना कृष्णा अभिषेक म्हणाला कि, ‘मी त्या प्रेक्षकांचाही आभारी आहे जे मला शोमध्ये परत येण्याची मागणी करत होते. मला वाटते की माझ्या पुनरागमनाची चर्चा माझ्या आणि शोशी संबंधित सर्वांच्या प्रेमामुळे झाली आहे.’ सुमारे एक आठवड्यापूर्वी कृष्णा अभिषेकने सांगितले होते की शोमध्ये परतण्यासाठी तो निर्मात्यांशी चर्चा करत आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते की, दरवेळेप्रमाणेच या वेळीही हे प्रकरण पैशांवरच अडकले आहे आणि करारात अशा काही गोष्टी आहेत, ज्या त्यांना मान्य नाहीत. त्यामुळेच उशीर होत आहे. पण परतावा जवळपास निश्चित आहे.
कृष्णा अभिषेकने सोमवारपासून शोचे शूटिंग सुरू केले आहे. रविवारी कपिलच्या घरी आगामी भागाच्या रिहर्सललाही त्याने हजेरी लावली.कृष्णाने त्याचे कपिल शर्मा किंवा इतर कोणत्याही सहकारी कलाकाराशी शत्रुत्व नाही असं देखील सांगितलं आहे. कृष्णा अभिषेकच्या शोमध्ये परतण्याचा हा निर्णय मेकर्सनी घेतला आहे जेव्हा शोला जूनमध्ये काही दिवस ब्रेक दिला जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. यावर कृष्णा म्हणाला की, ‘कपिलने आम्हाला सांगितले की, अजुन असे काहीही ठरलेले नाही.’ अमेरिकेच्या दौऱ्यात TKSS च्या चौथ्या सीझनचा निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात येत आहे.