करण-कजोलला मिळालं 'बेबीसीटिंग'चं काम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये करण आणि काजोल चक्क बेबी सीटिंगचं काम करताना दिसत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 28, 2019 10:34 AM IST

करण-कजोलला मिळालं 'बेबीसीटिंग'चं काम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मुंबई, 28 एप्रिल : निर्माता करण जोहर आणि अभिनेत्री काजोलची मैत्री बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेचा विषय असते. मात्र सध्या करण आणि काजोल एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आले आहे. त्यांचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण, या व्हिडिओमध्ये करण आणि काजोल चक्क बेबी सीटिंगचं काम करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ 'द कपिल शर्मा शो'मधील आहे.
 

Loading...

View this post on Instagram
 

Watch tonight #thekapilsharmashow 9.30pm on @sonytvofficial @karanjohar @kajol @kapilsharma full dhamaal masti don’t miss ❤️


A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen) on

वाचा : डेविड धवनने मुलाच्या लग्नाबद्दल केला मोठा खुलासा, सांगितलं कधी होणार लग्न

करण आणि काजोल यांनी नुकतीच 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती. यावेळी हे दोघंही कपिल शर्मा आणि टीमसोबत धमाल मस्ती करताना दिसले. मग कॉमेडीयन भारती सिंहनं सुद्धा करण आणि काजोलची फिरकी घ्यायची संधी कोणतीच संधी सोडली नाही. एवढंच नाही तर तिनं या दोघांना चक्क बेबी सिटिंगचं काम दिलं आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारती करण आणि कजोलकडे दोन बाहुल्या देते आणि सांगते या लहान बाळांना झोपवायचं आहे. तुम्ही दोघांनी हे करून दाखवा. त्यावर करण अंगाई गीत म्हणत बाळाला झोपवताना दिसत आहे. पण एवढ्यातच भारती त्याच्याकडून बाळला घेते आणि ते माझ्या अंगाईनेच झोपतील असं म्हणत त्यांच्या कानात जोरात 'सिंबा' सिनेमातील गाणं ओरडताना दिसत आहे.

वाचा : ‘कदाचित देवाला... ’ श्रुती हसनच्या बॉयफ्रेंडने भावुक पोस्ट लिहित तोडलं नातं

या शो दरम्यान काजोलनं करणला ती पहिल्यांदा भेटली होती त्यावेळचा एक किस्साही शेअर केला जो ऐकून सर्वांनाच आपलं हसू आवरणं कठीण झालं. काजोल सांगते, 'मी करणला पहिल्यांदा एका पार्टीमध्ये भेटले होते. त्यावेळी मला करण मला अजिबात आवडला नव्हता. पार्टीसाठी 'डिस्को थीम' ठेवण्यात आली होती आणि त्यावेळी करण थ्री-पीस सुट घालून आला होता आणि त्याला पाहून मी वेड्यासारखी हसले होते. मला हसू थांबवता येत नव्हत.'
याशिवाय या शोमध्ये अनेक गमतीदार किस्से काजोल आणि करणनं प्रेक्षकांशी शेअर केले. सोनी टीव्ही वरील लोकप्रिय 'द कपिल शर्मा शो' याआधी नवजोत सिंह सिद्धू होस्ट करत असे मात्र पुलवामा हल्ल्यानंतर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याला या शोमधून हटवण्यात आलं आणि त्याच्या जागी अर्चना पूरण सिंहला कास्ट करण्यात आलं.

वाचा : गेली ३० वर्ष हा अभिनेता लढतोय एड्सची लढाई, कधीही होऊ शकतो मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2019 09:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...