• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • HBD: जेव्हा 4 महिने गायब होता सिद्धार्थ सागर; समोर येत केला होता धक्कादायक खुलासा

HBD: जेव्हा 4 महिने गायब होता सिद्धार्थ सागर; समोर येत केला होता धक्कादायक खुलासा

‘द कपिल शर्मा शो’ मुळे मिळाली होती प्रसिद्धी

 • Share this:
  मुंबई, 15 जून- ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) च्या माध्यामतून अनेक कलाकार लोकांना खळखळून हसायला भाग पाडतात. या कलाकरांमुळे अनेक व्यक्ती आपल्या खाजगी अडचणी विसरून काही काळासाठी का होईना तणावमुक्त होतात. असाच एक हास्य कलाकार म्हणजे सिद्धार्थ सागर (Siddharth Sagar) होय. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील एक खळबळजनक किस्सा.
  सिद्धार्थ सागरने अनेक कॉमेडी शो केले आहेत. मात्र त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘द कपिल शर्मा शो’ यामुळे. स्त्री भूमिका असो किंवा इतर कोणतीही सिद्धार्थ अगदी उत्तम निभावतो. आणि आपल्या विनोदीवृत्तीने सर्वांनाचं हसायला भाग पाडतो. मात्र सन 2018 मध्ये सिद्धार्थ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला होता. त्यावेळी सिद्धार्थ चक्क गायब झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. एक दोन नव्हे तर तब्बल 4 महिने सिद्धार्थ गायब असल्याचं म्हटलं जातं होतं. त्याची जवळची मैत्रीण असणाऱ्या सोमी सक्सेनाने ही माहिती आपल्या फेसबुक पेजवरून सर्वांना दिली होती. त्यामुळे त्याचे चाहते खुपचं चिंतेत होते.
  त्यांनतर सिद्धार्थने स्वतः समोर येत आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेयर केला होता. त्यामध्ये त्याने म्हटलं होतं, ‘मी सुखरूप आहे. मात्र मी सध्या खुपचं तणावाखाली आहे. खूप काही आयुष्यात सुरु आहे. माझ्यासोबत खूप काही झालं आहे. ते मी लवकरच मीडियाद्वारे तुमच्यापर्यंत पोह्चवेन’. अशा आशयाचा व्हिडीओ सिद्धार्थने शेयर केला होता. (हे वाचा: शाहरुखच्या DDLJ मुळे बदललं होतं सुशांतचं आयुष्य; वाचा काय आहे तो किस्सा  ) मात्र त्याने केलेल्या खुलास्यामुळे सर्वांनाचं धक्का बसला होता. त्याने खुलासा करत आपली आई आणि आपलं कुटुंबचं आपल्याला ड्रग्स देत असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी मला वेड्यांच्या रुग्णालयात पोहचवल्याचं देखील म्हटलं होतं. त्यामुळे सर्वच लोक अचंबित झाले होते.
  Published by:Aiman Desai
  First published: