मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /शाहरुखच्या DDLJ मुळे बदललं होतं सुशांतचं आयुष्य; वाचा काय आहे तो किस्सा

शाहरुखच्या DDLJ मुळे बदललं होतं सुशांतचं आयुष्य; वाचा काय आहे तो किस्सा

सुशांत सिंह उच्चशिक्षित असूनही या क्षेत्रात करिअर करण्याकडे कसा वळला, अभिनयाच्या क्षेत्रात आपले नाव कमवण्यासाठी त्याने कसे प्रयत्न केले, त्याच्यावर कोणत्या कलाकारांचा कोणत्या कलाकृतींचा सर्वाधिक प्रभाव होता हे जाणणं देखील महत्वाचं आहे.

सुशांत सिंह उच्चशिक्षित असूनही या क्षेत्रात करिअर करण्याकडे कसा वळला, अभिनयाच्या क्षेत्रात आपले नाव कमवण्यासाठी त्याने कसे प्रयत्न केले, त्याच्यावर कोणत्या कलाकारांचा कोणत्या कलाकृतींचा सर्वाधिक प्रभाव होता हे जाणणं देखील महत्वाचं आहे.

सुशांत सिंह उच्चशिक्षित असूनही या क्षेत्रात करिअर करण्याकडे कसा वळला, अभिनयाच्या क्षेत्रात आपले नाव कमवण्यासाठी त्याने कसे प्रयत्न केले, त्याच्यावर कोणत्या कलाकारांचा कोणत्या कलाकृतींचा सर्वाधिक प्रभाव होता हे जाणणं देखील महत्वाचं आहे.

पुढे वाचा ...

मुंबई 14 जून: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आज आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणी आपल्या मनात कायम आहेत. आज म्हणजेच 14 जूनला सुशांतच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाले. त्याने आपल्या अल्पशा करिअरमध्ये अनेक दर्जेदार चित्रपट केले. अनेक चित्रपटांमधील (Cinema) त्याच्या भूमिका आणि अभिनय आजही प्रेक्षक तसेच त्याचे फॅन्स विसरु शकलेले नाही. परंतु, सुशांत सिंह उच्चशिक्षित असूनही या क्षेत्रात करिअर करण्याकडे कसा वळला, अभिनयाच्या क्षेत्रात आपले नाव कमवण्यासाठी त्याने कसे प्रयत्न केले, त्याच्यावर कोणत्या कलाकारांचा कोणत्या कलाकृतींचा सर्वाधिक प्रभाव होता हे जाणणं देखील महत्वाचं आहे. सुशांत उच्चशिक्षित होता. दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने युएसएतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून स्कॉलरशिप मिळवली होती. परंतु, अभिनेता (Actor) म्हणून ओळख मिळवण्यासाठी त्याने आपले शैक्षणिक करिअर मागे सारले.

‘तुझ्याशिवाय आयुष्य...’; सुशांतच्या आठवणीनं रिया चक्रवर्ती झाली व्याकूळ

2017मध्ये सुशांतसिंह राजपूतने एचटीशी बोलताना इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ते अभिनेता असा प्रवास उलगडून दाखवला होता. शाहरुख खानचा (Shahrukh Khan) आपल्यावर कसा प्रभाव आहे, केवळ स्टार म्हणूनच नव्हे तर तो कोण आहे याबाबतचा संभ्रमही दूर झाला हे देखील त्याने यावेळी नमूद केले होते. त्यावेळी सुशांतसिंहने असे सांगितले होते की मी बॉलिवूडमुळे (Bollywood) प्रभावित झालो नव्हतो. मी शाहरुख खानचा मोठा फॅन होतो. मी जेव्हा त्याचा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट पाहत होतो तेव्हा माझ्या मनात विचार आला की हे सर्व किती चांगले आहे. परंतु, त्याने मला फार प्रभावित केले नाही. शाहरुखने माझा भ्रम दूर कऱण्यास मदत केली आणि मी काय केले पाहिजे हे सांगितले.

भाग्यश्री मोटेनं सांगितलं आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित; चाहत्यांना बसला धक्का

90 चे दशक सुरु होण्याचा तो काळ होता. अर्थव्यवस्थेला हळूहळू गती येत होती. आम्ही पहिल्यांदाच कोकचे कॅन पाहत होतो. आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड (International Brands) भारतात येत होते, या सर्व स्थितीने मला फार प्रभावित केले होते. मॉडर्न संस्कृतीचा अवलंब करायची की पारंपारिक संस्कृती जपायची याबाबत मला माहिती नव्हते. मी जेव्हा इयत्ता 6 वीत होतो, त्याच दरम्यान डीडीएलजे (DDLJ) प्रदर्शित झाला. यातील राजने मला शिकवलं की बिअर पिणे हे कूल असते असे असतानाही त्याने सिमरनच्या वडिलांची परवानगी मिळावी याकरिता वाट पाहिली. इथं एक संतुलन होतं. एक महत्वाकांक्षी भारत आणि आपली संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणारे भारताचे आदर्श विवाहाचे उदाहरण होतं, असंही सुशांत म्हणाला होता.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Shahrukh khan, Sushant Singh Rajput, Sushant singh rajput case