मुंबई, 9 ऑक्टोबर : देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे नेताजी सुभाषचंद्र बोस हे मुकुटमणी आहेत. सुभाषचंद्र बोस यांनी प्राणांची पर्वा न करता इंग्रजांविरूद्ध लढा दिला. भारताच्या बाहेर राहून आझाद हिंद सेनेचे स्थापना केली. या सैन्याला ‘चलो दिल्ली’ असा आदेश दिला. स्वातंत्र्याच्या शेवटच्या टप्प्यात आझाद हिंद सेनेने ब्रिटीश राजवटीवर निर्णायक घाव घातला. सुभाषचंद्र बोस यांचे भाऊ शरदचंद्र बोस यांनीही अनेकवेळा ब्रिटीशांच्या दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवला. त्यामुळे त्यांना अनेकवेळा तुरूगांत तसेच नजरकैदेत ठेवण्यात आले होते. The Bose Legacy शरदचंद्र बोस यांनी त्यांचे पूत्र अमिया नाथ यांना तुरूंगातून पाठवलेले पत्र, नेताजी आणि शरदचंद्र हे भाऊ स्वातंत्र्य लढा लढत असताना त्यांचे कुटुंबांशी संबंध कसे होते, हे सर्व अज्ञात पैलू उलगडणारं The bose legacy’ या इंग्रजी नाटकाचा प्रयोग शनिवारी मुंबईतील एन. सी. पी. ए, एक्स्पे्रिमेंटल थिएटरमध्ये पार पडले. सुभाषचंद्र बोस यांचे पुतणे अमिया नाथ यांच्या कन्या माधुरी बोस या नाटकादरम्यान उपस्थित होत्या. माधुरी यांनी 6 वर्षांपूर्वी बोस यांच्या जीवनावर आधारित पुस्तक लिहिले होते. हे नाटक त्याच पुस्तकावर आधारित करण्यात आले. निखिल कटारा आणि हिमाली कोठारी हे या नाटकाचे लेखक आहेत. IAS होण्यासाठी ‘तिनं’ सोडली लाखो रुपये पगाराची नोकरी; IPS पतीनं केली अशी मदत “माझे आजोबा नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शरतचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलं पण अमियानाथ कुटुंबाशी त्यांनी संबंध जोपासले. त्यांनी दोन्हीकडे म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात आणि कुटुंबात सारखेच योदान दिले. तुरुंगवासात असताना त्यांनी पत्र पाठवले आणि याच पत्रांच्या संकलनातून सुंदर नाटक सादर झालं” असं माधुरी बोस यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाच्या आयोजक ब्रिंदा शंकर म्हटल्या की’ सादर झालेल्या ‘The Bose Legacy’ या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या नाटकाचे भाषांतर करण्याचा सुद्धा आम्ही पुढील दिवसांत प्रयत्न करणार आहोत. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शरतचंद्र बोस यांचा कौटुंबिक पत्रांचा खजिन्याचे जतन व त्यांचा वारसा जपण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला आहे. दरम्यान, ‘The Bose Legacy’ हे नाटक पाहण्यासाठी एन. सी. पी. ए, एक्स्पे्रिमेंटल थिएटरमध्ये मुंबईकरांनी चांगली गर्दी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.