मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

एकाच सिनेमातून 3 स्टारकिड्सचा डेब्यू; बड्या कलाकारांची मुलं आणि नातवंडं झळकणार, The Archies चं पोस्टर रिलीज

एकाच सिनेमातून 3 स्टारकिड्सचा डेब्यू; बड्या कलाकारांची मुलं आणि नातवंडं झळकणार, The Archies चं पोस्टर रिलीज

सध्या अनेक बॉलिवूड कलाकारांची मुले इंडस्ट्रीमध्ये   (Starkids)  एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत. अनन्या पांडे, शनाया कपूरनंतर आता बॉलिवूड किंग शाहरुख खानची मुलगी (Shahrukh Khan Daughter)  सुहाना खान (Suhana Khan), अमिताभ बच्चन यांचा नातू अगत्स्य नंदा   (Agtsya Nanda)  आणि ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आणि जान्हवी कपूरची बहीण ख़ुशी कपूरसुद्धा   (Khushi Kapoor)  आपल्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 14 मे- सध्या अनेक बॉलिवूड कलाकारांची मुले इंडस्ट्रीमध्ये   (Starkids)  एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत. अनन्या पांडे, शनाया कपूरनंतर आता बॉलिवूड किंग शाहरुख खानची मुलगी (Shahrukh Khan Daughter)  सुहाना खान (Suhana Khan), अमिताभ बच्चन यांचा नातू अगत्स्य नंदा   (Agtsya Nanda)  आणि ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आणि जान्हवी कपूरची बहीण ख़ुशी कपूरसुद्धा   (Khushi Kapoor)  आपल्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहेत. या तिघांनी नुकतंच आपल्या 'द आर्चिज' या डेब्यू चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. सध्या त्यांच्या या चित्रपटाचं पोस्टर प्रचंड चर्चेत आलं आहे.

बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक स्टारकिड्सनी पदार्पण केलं आहे. अनेक स्टारकिड्स यशस्वी झाले आहेत. तर काहींना हवं तसं यश मिळू शकलं नाही. तथापि जास्तीत जास्त स्टार किड्सच्या मुलांना दिग्दर्शक करण जोहरनं लॉन्च केलं आहे. त्यामुळे सर्वांनाचं अपेक्षा होती, की शाहरुखची लेक सुहानालासुद्धा करण जोहरचं लॉन्च करणार. मात्र या चर्चा मोडीत निघाल्या कारण जोया अख्तर सुहाना खानला लॉन्च करणार असल्याचं आता स्पष्ट झालंआहे. जोयाने आपल्या आगामी चित्रपटासाठी सुहाना, अगत्स्य आणि ख़ुशीची निवड केली आहे.

" isDesktop="true" id="702527" >

सुहाना खानने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने आपल्या पहिल्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. सुहाना आणि शाहरुखचे चाहते हा पोस्टर पाहून प्रचंड आनंदी आहेत. तसेच या पोस्टवर युजर्स भरभरून लाईक्स, कमेंट्स करत शुभेच्छा देत आहेत. या पोस्टरमध्ये असणाऱ्या स्टार किड्सचा लुक पाहून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी फारच उत्सुक आले आहेत. सोबतच युट्युबर या चित्रपटाचा पहिला टीजरसुद्धा समोर आला आहे. 1 मिनिट 35 सेकंदाचा हा टीजर आहे. अवघ्या 46 मिनिटांपूर्वी रिलीज झालेल्या या टीजरला 1.3 k लाईक्स मिळाले आहेत.तर सुहानाच्या या पोस्टवर अर्ध्या तासात 1 लाखाच्यावर लाईक्स मिळाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

जोया अख्तरचा हा चित्रपट आंतरराष्ट्रीय कॉमिक बुक असणाऱ्या ‘आर्ची फॉर ए स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म’वर आधारित आहे. हा चित्रपट एका टीनएज जनरेशनवर आधारित असणार आहे.त्यामुळे या चित्रपटात सर्व फ्रेश चेहरे दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाच्या टीजर आणि पोस्टरची प्रचंड चर्चा होत आहे.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Shahrukh khan, Suhana khan