मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /The Archies: सुहाना खान, खुशी कपूर अन् अगस्त्य नंदा... हे स्टारकिड्स एकत्र करणार बॉलिवूड एंट्री; झोया अख्तरच्या नव्या सिनेमाची घोषणा

The Archies: सुहाना खान, खुशी कपूर अन् अगस्त्य नंदा... हे स्टारकिड्स एकत्र करणार बॉलिवूड एंट्री; झोया अख्तरच्या नव्या सिनेमाची घोषणा

कॉमिक बुकवर (Comic book) आधारित चित्रपट 'द आर्चीज' (The Archies) लोकांच्या भेटीला येणार आहे. या कॉमिक बुकमधील काल्पनिक पात्रं आर्ची अँड्र्यूज आणि त्याचे मित्र आता नेटफ्लिक्सवर (Netflix) चित्रपटात दिसणार आहेत. या सिनेमातून एकाचवेळी तीन स्टारकिड्स बॉलिवूड डेब्यू करणार आहेत

कॉमिक बुकवर (Comic book) आधारित चित्रपट 'द आर्चीज' (The Archies) लोकांच्या भेटीला येणार आहे. या कॉमिक बुकमधील काल्पनिक पात्रं आर्ची अँड्र्यूज आणि त्याचे मित्र आता नेटफ्लिक्सवर (Netflix) चित्रपटात दिसणार आहेत. या सिनेमातून एकाचवेळी तीन स्टारकिड्स बॉलिवूड डेब्यू करणार आहेत

कॉमिक बुकवर (Comic book) आधारित चित्रपट 'द आर्चीज' (The Archies) लोकांच्या भेटीला येणार आहे. या कॉमिक बुकमधील काल्पनिक पात्रं आर्ची अँड्र्यूज आणि त्याचे मित्र आता नेटफ्लिक्सवर (Netflix) चित्रपटात दिसणार आहेत. या सिनेमातून एकाचवेळी तीन स्टारकिड्स बॉलिवूड डेब्यू करणार आहेत

पुढे वाचा ...

  मुंबई, 18 एप्रिल: चित्रपटसृष्टीत सध्या खूप बदल होत आहेत. नव्या पिढीतील नवे कलाकार आपली कला जोमाने सादर करत आहेत. तसेच दिग्दर्शकदेखील नवनव्या गोष्टी लोकांसमोर घेऊन येत आहेत. यातच आता एका कॉमिक बुकवर (Comic book) आधारित चित्रपट 'द आर्चीज' (The Archies) लोकांच्या भेटीला येणार आहे. या कॉमिक बुकमधील काल्पनिक पात्रं आर्ची अँड्र्यूज आणि त्याचे मित्र आता नेटफ्लिक्सवर (Netflix) चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन झोया अख्तर (Zoya Akhtar) करणार आहे. या चित्रपटाचं कथानक भारतातील 1960 च्या काळातील किशोरवयीन मुलांच्या मनस्थितीच्या पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती 'टायगर बेबी' आणि 'ग्राफिक इंडिया' या कंपन्या करणार आहे.

  'द आर्चीज'च्या रिमेकद्वारे बॉलिवूडमधील स्टार किड्स सुहाना खान (Suhana Khan), खूशी कपूर (Khushi Kapoor) आणि अगस्त्य नंदा (Agastya Nanda) हे अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत. सुहाना खान ही अभिनेता शाहरुख खानची मुलगी आहे. खूशी कपूर ही अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता-दिग्दर्शक बोनी कपूर यांची धाकटी मुलगी आहे. तर अगस्त्य हा अमिताभ बच्चन यांचा नातू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अगस्त्य हा आर्ची अँड्र्यूजच्या भूमिकेत दिसणार आहे, तर खूशी आणि सुहाना या बेट्टी आणि वेरोनिका यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

  हे वाचा-लग्नाच्या 11 वर्षानंतर आई बनली देबिना, 'सोसायटी प्रेशर' अन् 'या' गंभीर समस्येचाही केला सामना

  झोया अख्तर दिग्दर्शित करत असलेल्या 'द आर्चीज' या चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी झाली होती. सुहाना खान, खूशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांनी प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटाचं शूटिंग सोमवारी (18 एप्रिल 2022) सुरू झालं असल्याची माहिती निर्मात्या रिमा कागती (Producer Reema Kagti) यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे.  रिमा कागती यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये 'द आर्चीज' चित्रपटाच्या पहिल्या शॉटची माहिती देणाऱ्या एका क्लिपबोर्डचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टला त्यांनी #Archie’s #shootstarts #TigerBaby’s first solo production #partnerincrime @zoieakhtar @netflix_in असं कॅप्शन दिलं आहे. नेटफ्लिक्सच्या अधिकृत सोशल मीडिया पेजेसवरुन देखील ही पोस्ट करण्यात आली आहे. तर झोया अख्तरने देखील 'बॅक टू द फ्युचर' अशी कॅप्शन देत या सिनेमाच्या क्लिपबोर्डचा फोटो शेअर केला आहे. फरहान अख्तरने ही पोस्ट त्याच्या इन्स्टा स्टोरीवर टाकून चित्रपत्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

  View this post on Instagram

  A post shared by Zoya Akhtar (@zoieakhtar)

  TV9 भारतवर्षने दिलेल्या माहितीनुसार झोया अख्तरने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच आपल्या या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली होती. त्यादरम्यान झोयाने सांगितलं होतं की, 'मला 'द आर्चीज' ला पडद्यावर सादर करण्याची संधी मिळाली. मला याचा खूप आनंद झाला आहे. या कॉमिक बुकनं माझ्या बालपणात आणि किशोरवयात मला खूप साथ दिली आहे. चित्रपटातील सर्व पात्रं आयकॉनिक आहेत. ही पात्रं जगभरातील लोकांच्या पसंतीस उतरली आहेत. त्यामुळे माझ्यावरची जबाबादारी वाढली आहे आणि त्यामुळेच मी थोडी नर्व्हसदेखील आहे.' दिग्दर्शक जोया अख्तरने यापूर्वी 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'दिल धडकने दो', 'गली बॉय' यांसारख्या यशस्वी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Bollywood, Bollywood actress, Netflix, Suhana khan