Home /News /entertainment /

लग्नाच्या 11 वर्षानंतर आई बनली देबिना, 'सोसायटी प्रेशर' अन् 'या' गंभीर समस्येचाही केला सामना

लग्नाच्या 11 वर्षानंतर आई बनली देबिना, 'सोसायटी प्रेशर' अन् 'या' गंभीर समस्येचाही केला सामना

अभिनेत्री देबिना बॅनर्जीसाठी या वर्षीचा वाढदिवस खूपच खास आहे. कारण आठवड्याभरापूर्वीच ती आई झाली आहे. लग्नानंतर जवळपास 11 वर्षांनंतर गुरमीत चौधरी (Debina Bonnerjee and Gurmeet Choudhary become parents to a baby girl) आणि देबिनाच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 17 एप्रिल: देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) हे टीव्ही जगतातलं एक प्रसिद्ध नाव आहे. तिनं 'रामायण'सह (Ramayana) अनेक टीव्ही सीरियल्समध्ये काम केलं आहे. सीतेची भूमिका साकारल्यानंतर देबिनाला प्रसिद्धी मिळाली होती. आज (18 एप्रिल) देबिना बॅनर्जी तिचा 35 वा वाढदिवस (Debina Bonnerjee Birthday) साजरा करत आहे. देबिना बॅनर्जीसाठी या वर्षीचा वाढदिवस खूपच खास आहे. कारण आठवड्याभरापूर्वीच ती आई झाली आहे. लग्नानंतर जवळपास 11 वर्षांनंतर गुरमीत चौधरी (Debina Bonnerjee and Gurmeet Choudhary become parents to a baby girl) आणि देबिनाच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दोघांनीही चाहत्यांना प्रेग्नन्सीची बातमी दिली होती. त्यांच्या घरी गेल्या आठवड्यात मुलीचा जन्म झाला आहे. मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी या जोडप्यानं एका पार्टीचं आयोजन केलं आहे. त्यामध्ये इंडस्ट्रीतले अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत. मुलीच्या जन्मामुळे गुरमीत आणि देबिना फारच आनंदी आहेत; मात्र हा आनंद सहजासहजी मिळालेला नाही. आई होण्यापूर्वी देबिनाला सामाजिक दबावाचा (Social Pressure) सामना करावा लागला. 'आज तक'नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे वाचा-एकदम कडSSक! मराठी नाटकाचा शो परदेशात हाऊसफुल्ल, सुबोध भावेने शेअर केला Photo टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये 'राम-सीता' नावानं प्रसिद्ध असलेल्या गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जीनं 15 फेब्रुवारी 2011 रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला 11 वर्षं पूर्ण झाली आहेत. 11 वर्षांनंतर त्यांच्या घरी पहिल्या बाळाचा जन्म झाला आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी बाळासाठी अनेकदा प्रयत्न केले होते. गुरमीत आणि तिनं अनेक गायनॅकॉलॉजिस्टचे (Gynecologist) सल्ले घेतले. आयव्हीएफद्वारे (IVF) गर्भधारणेचा प्रयत्न केला; मात्र काही कारणास्तव देबिनाला बाळ (conceive) होण्यात अपयश येत होतं. तिला गर्भधारणा का होत नाही हे जाणून घेण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. तेव्हा देबिना बॅनर्जी अँडोमेट्रिओसिसच्या (Endometriosis) समस्येनं त्रस्त असल्याचं निदान झालं. त्यामुळे तिला आई होण्यास अडचणी येत होत्या. अँडोमेट्रिओसिस असलेल्या स्त्रीच्या गर्भाशयाच्या (Uterus) आत रक्तस्राव होतो. त्यामुळे गर्भधारणेत अडचणी येतात. या समस्येनं त्रस्त असलेल्या देबिनानं प्रथम अ‍ॅलोपॅथी औषधं घेतली. यानंतर तिनं अ‍ॅक्युपंक्चरसारख्या थेरपीचा (Acupuncture Therapy) आधार घेतला. या थेरपीमध्ये तुमच्या शरीरातले सर्व विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. देबिना दररोज सकाळी दहा वाजता डॉक्टरांकडे उपचारासाठी पोहोचायची. अथक प्रयत्नांनंतर तिला आई होता आलं. देबिना बॅनर्जीसाठी या सर्व गोष्टी फारच त्रासदायक होत्या. लग्नाला 11 वर्षं होऊनही आई होत नसल्यामुळे तिला प्रचंड सोशल प्रेशरचा सामना करावा लागला. हे वाचा-KGF 2: Yash चा बॉडीगार्ड होता केजीएफचा हा भयावह व्हिलन, वाचा 'गरुडा'ची सुपरस्टार बनण्याची कहाणी देबिना म्हणाली, की 'प्रेग्नन्सीसाठी माझ्यावर खूप सोशल प्रेशर होतं. माझ्या मेडिकल कंडिशनबाबत कोणालाही माहिती नव्हतं. मी कोणत्या त्रासातून जात होते याची कोणाला जाणीवही नव्हती. तुम्ही एखाद्यावर दबाव आणला तर ती व्यक्ती व्यवस्थित काम करू शकत नाही, ही साधी गोष्टही लोकांना का समजत नाही.' आपला अनुभव शेअर करण्यासोबतच देबिनानं चाहत्यांना एक सल्लाही दिला आहे. 'जर कोणी तुमच्यावर कोणत्याही गोष्टीसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना तसं करू देऊ नका,' असं ती म्हणाली. काल (17 एप्रिल 2022) देबिना आणि गुरमीतनं आपल्या मुलीचं नाव जाहीर केलं आहे. त्यांनी आपल्या मुलीचं नाव लियाना (Lianna) असं ठेवलं आहे.
First published:

Tags: Entertainment, Pregnancy, Tv actress

पुढील बातम्या