मुंबई, 2 सप्टेंबर- मराठी अभिनेत्री तेजस्वीनी पंडितने आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. एक सालस आणि गुणी अभिनेत्री म्हणून तेजस्विनीला ओळखलं जातं. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांना तिच्याबाबत लहान-लहान अपडेट जाणून घ्यायला आवडतं. त्यामुळेच तेजस्विनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्याबाबत प्रत्येक अपडेट शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून भरभरुन प्रेम आणि प्रतिसाद मिळत असतो. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. घरोघरी थाटामाटात बाप्पा विराजमान झाले आहेत. सर्वसामान्य लोकांपासून सेलेब्रेटींपर्यंत या सणाची मोठी उत्सुकता दिसून येत आहे. बाप्पाच्या आगमनाने सर्वांच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव होत आहे. दरम्यान गणरायाच्या आशीर्वादाने तेजस्विनी पंडितच्या आयुष्यात एक आनंदी घडामोड घडली आहे. अभिनेत्रीने गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर आलिशान कार खरेदी केली आहे. अभिनेत्रीने स्वतः लाच ही कार भेट केली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर पोस्ट लिहत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. तेजस्विनी पंडित इन्स्टाग्राम पोस्ट- ‘‘गणपती बाप्पा मोरया || माझ्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण तुमच्याबरोबर share करतेय…“माझी स्वतःची नवीन कार….माझ्यासाठी कार ही कधीच luxury नव्हती, necessity होती…पण मी स्वतःला एक luxurious #madeinindia कार गिफ्ट करू शकले ह्यासाठी आत्ता मनात फक्त कृतज्ञता आहे.आजपर्यंत खूप प्रवास केला… पण एक मात्र पक्कं ठरलंय माझं..आता नुसता प्रवास नाही करायचा ..आता प्रवासाची “मज्जा लुटायची… “आई, दीदी आणि आजपर्यंतच्या प्रवासात नेहमीच माझ्या बरोबर असणारा माझा “बाबा”…तुमच्या आशिर्वादामुळेच हे शक्य झालं…’
(हे वाचा: गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर रितेश जेनेलियानं खरेदी केली नवी कोरी BMW;किंमत वाचून व्हाल थक्क ) अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांपासून सेलेब्रेटींपर्यंत सर्वजण अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत. आणि तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तेजस्विनी पंडितची ही पोस्ट सध्या प्रचंड पसंत केली जात आहे. अभिनेत्रीने पोस्ट लिहत आपल्या नव्या कारसोबतचे आपले फोटोही शेअर केले आहेत. अभिनेत्रीने ब्लॅक कलरची महिंद्रा कंपनीची XUV 700 ही कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत 13 लाखपासून ते 24 लाखपर्यंत असते. या कारमध्ये आतील लेआउट उत्कृष्ट आहे. सॉफ्ट टच मटेरिअल क्रोम ऍक्सेंटचा वापर कारला आणखीनच लग्झरी टच देतो. कारमध्ये टचस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टम, सोनी थ्रीडी साउंड सिस्टम, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, केबिन एयर फिल्टर, ऍम्बिएन्ट लायटिंग, ड्युअल झोन ऑटोमॅटिक एसी, मल्टी फंक्शन स्टिअरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, यासह अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. नुकतंच अभिनेता देशमुखनेही एक नवी BMW कार खरेदी केली आहे.