मराठी टेलिव्हिझनची लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) आपल्या अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी फारच प्रसिद्ध आहे. सोशल मीडिया सक्रिय असणारी तेजश्री नेहमीच नवनवीन लुक्स शेअर करत असते. तर यावेळी तिने काही जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत.
तिने सुरूवातीला म्हटलं आहे, "तुम्हाला ती जुनी #dairymilk ची ad आठवते का? ज्यात ती मुलगी डान्स करत धावत स्टेडियम मधे शिरते जिंकण सेलिब्रेट करायला आणि मग cameras तिच्यावर येतात सगळे.. तसा काहीसं वाटलं मला हा फोटो काढताना .."
तर नंतर तिने लिहिलं की, "मला लहानपणी पासून एकदा तरी तिच्या सारखं करायचं होतं ( फक्त मी पुण्याच्या रस्त्यावर केलं आणि फार कोणी दखल घेतली नाही एवढंच but उसमें क्या है.. I enjoyedddd)"
काही महिन्यांपूर्वी तेजश्रीच्या अग्गंबाई सासूबाई मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर मात्र तेजश्री अद्याप कोणत्याही मालिकेत दिसली नाही.